प्रसाद आणि त्याचा अर्थ…




Like
Like Love Haha Wow Sad Angry

The prasad is then considered to have the deity’s blessing residing within it. In contemporary Hindu religious practice in India, the desire to get prasada and have darshana are the two major motivations of pilgrimage and temple visits. a devotional offering made to a god, typically consisting of food that is later shared among devotees.

 

Offeringsदेव, देवता, थोर पुरुष, गुरु, किंवा अवतारी महात्मा यांनी प्रसन्न होउन दिलेली देणगी, आशीर्वाद किंवा केलेली कृपा म्हणजेच ‘प्रसाद’ होय.यश, पूर्णत्व किंवा सार्थकता व्यक्त करण्यासाठी सुद्धा प्रसाद वाटण्याची सुद्धा आपल्याकडे प्रथा आहे. प्रसादाला खिरापत, क्षिरापत, शिरणी,काला इत्यादी नावे आहेत. हल्ली पेढे वाटतात संत ज्ञानदेवांनी प्रसादाला ‘पसायदान’ अशा सुंदर शब्दांनी वर्णिले आहे. प्रसाद म्हणजे सर्व स्वादांचे स्वामी आणि नऊ रसांचे अवीट मिश्रण असते. त्याची गोडी अवर्णीय असते . त्याची चव गोड, कडू, आंबट, तिखट, तुरट, स्निग्ध, चटकदार, मसालेदार याहून आगळी, निराळी सर्व श्रेष्ठ आणि अमृताही लाजवणारी असते. कुठल्याही धार्मिक स्थळी कीर्तन, भजन, प्रवचन यात समरस झाल्यांनतर मिळणार्या प्रसादाची लज्जत तेव्हाच अनुभवता येते. भगवान श्रीकृष्णांनी अशीच लज्जत आणण्यासाठी त्यांनी आपल्या गरीब-श्रीमंत सवंगड्यांच्या शिदोऱ्या एकत्र करून मोठ्या आनंदाने मिटक्या मारून एका पंगतीत सर्व मिळून स्वाद घेत असत. त्यांनी त्याला ‘काला’ असे नामाभिमान केले होते. त्यालाच आपण ‘महाप्रसाद’ म्हणतो. पण आताच्या या महाप्रसादाला त्या काळची गोडी उरलेली नाही त्यातून ती उदात्त भावना, प्रेम, भक्ती किंवा समर्पण भावाचा हेतू सफल होताना सुद्धा दिसत नाही. कणभर प्रसादाने मन उच्च कोटीची प्रसन्नता प्राप्त करते. आणि पोटभर महाप्रसादाने काया,वाचा आणि मन पुलकित आणि प्रसन्न होवून जात.

प्रभू तुलसीदास म्हणतात…. भगवंताच्या प्रसादाचा केवळ सुगंध आला, तरी प्रसाद प्राप्तीचे सामाधान मनात बाळगावे, कुठलेही जेवणाचे निमंत्रन, प्राप्त वस्त्र, आभूषण हे देवाचाच प्रसाद होय.

प्रसादाचे अवमूल्यन :- आजच्या या काळात भजन,पूजन आरती या वेळी दांडी मारून ऎन प्रसादाच्या शुभ वेळी हात उंचावत प्रसाद वाटप कर्त्याच्या आवटी भवती झुंबड गर्दी करून जास्तीत जास्त प्रसाद साठवण्यासाठी मनुष्य सरसावतो. अशा पोटभरू वृत्तीमुळे प्रसादाचे मुल्य फार कमी झाले आहे. तो जमा केलेला प्रसाद शेवटी अंगना बाहेर कुठेही अपवित्र जागेतही टाकण्यात येतो. त्यालाच म्हणतात प्रसादाचे अवमूल्य. म्हणजेच प्रसादाचे महात्म किंवा महाप्रसादाची किंमत कळलीच नाही असे मानावे लागेल.

प्रसाद साफल्य :- काही दुर्जन किंवा बडेजाव पणाचा भाव आणणारे विध्नसंतोषी मनुष्य आपल्याला काय प्रसादाचे सोयर -सुतक म्हणणारे यांनाही प्रसादाचे महत्व नाही असे मानावे लागेल. भक्त सुदामाने आणलेले मुठभर पोहे श्रीकृष्णांनी तर एकाच घासात संपविले असते. परंतु त्यांच्या सोळा सहस्त्र स्त्रियांनी सर्व मिळून त्या प्रसादाचा लाभ घेण्याची इच्छा प्रगट करवून दिली व ती इच्छा तृप्त केली त्या मागे हाच उद्देश होता कि हेच खरे प्रसादाचे साफल्य!

या प्रमाणे मनाची, सर्व इंद्रियांची परोपकारी वृत्ती आणि पवित्र भावना प्रसादाचे अनन्य महत्व व सार्थकता दर्शविते. म्हणून त्याचे महत्व प्रसाद देणारा, घेणारा आणि खाणारा या सर्वांनी समजून घ्यावे. तेव्हाच प्रसादाची सार्थकता अन्यथा सर्व व्यर्थ ! म्हणून सुज्ञान व्यक्ती इतरांसाठी प्रसाद मागताना म्हणतात,….परमपिता परमात्मा, सब तेरी संतान, भला करो सबका प्रभू, सबका हो कल्याण. हाच आशीर्वाद सर्वांसाठी प्रसाद रूपाने मागतात. म्हणून म्हणावेसे वाटते भगवंताच्या खर्या प्रसादाचे धनी व्हा आणि प्रसादाचा खरा स्वाद घ्या.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu