प्राणी ते मनुष्यत्व– मनुष्य ते पशुत्व–




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Human body is a gift of got which we got from heaven. It’s a great transformation of animal to human body and then from human body to animal. Human behavior is now becomes like animal. It’s a true story that now human are behaving like animal.

consequences-of-evolution-animal-to-human-to-Devil

आज आपण पाहातो प्राणीमात्रांमध्ये सुद्धा आत्मबोध दिसून येतो. माया, ममता, वात्सल्य, ईमानदारी आणि बुद्धिमत्ता सुद्धा दिवसें दिवस प्राणी मात्रांत वाढलेली आढळते. मनुष्याच्या पलीकडचा बोध त्यांच्या प्रवृत्तीत दिसायला लागलेला आहे. परंतु आजच्या मानवाला आपल्या आत्म स्वरूपाचाच विसर पडत चाललेला दिसतो. चौर्यांशी लक्ष योनी नंतर मानव देह प्राप्त होतो हे आपले धर्म गुरु, श्रेष्ठ संत, सत्पुरुष सांगून जातात, परंतु त्यापासून ज्या प्रकारे ज्ञाना ची प्रचीती व्हायला हवी ती दिवसेंदिवस लोप पावत आहे. संत म्हणतात, मनुष्यच एक असा प्राणी आहे याला देवाचा राजकुमार म्हणतात, ईश्वराने मानवास स्वतंत्र चिंतन शक्ती वरदान केली की त्याच्या आधारे तो आपला विकास करून देवतांपेक्षा ही उच्चतम स्थान प्राप्त करू शकेल.

परंतु ते सर्व दूरच राहिले तो स्वत:चे आत्मस्वरूप काय ते ही विसरलेला आहे. त्याचे ते दुराचरण त्याला पतनाकडे नेत आहे. भ्रष्ट चिंतनाद्वारे तो नरपशूची भूमिका निभावत आहे. त्याच्या या भूमिकेतून तो स्वत:च्या परिवारातील जेष्टांवरच अत्याचार करीत आहे. आजच्या या मानवपरीवारांत वृद्ध माता-पिता, जेष्ठ यांची फार दयनीय अवस्था होत असल्याचे आढळून येत आहे.

आज परिवारातील जेष्ठांना जुन्या रूढी घेऊन चाललेले, तसेच आजच्या प्रगतीचे बाधिक व निंदनीय व्यक्ती मानल्या जात आहे. म्हातारपणाला आज आर्थिक बोझ मानल्या जात आहे. आणि थोडी फार समज ठेवून दया दाखविणारी संतान तर त्यांच्यावर उपकार केल्याचे प्रदर्शन करीत आहेत. त्याच प्रमाणे आजच्या या विकसित देशांत म्हाताऱ्यांचा अलग संसार मांडल्या जात आहे किंवा त्यांच्यासाठी वृद्धाश्रम, महिला-निकेतन, सेवा संघ चालविल्या जात आहे. हि आजची युवा पिढी- म्हणजे पती-पत्नी आपल्या आनंदात व संपत्ती जुळविण्यात ईतकी मग्न होत चाललेली आहे कि कधी कधी त्यांच्या स्वत:च्या अपत्यां कडेही दुर्लक्ष करून बसलेली आहे. संपत्ती च्या मोहाला बळी पडून स्वत:ची मुले त्यांच्या डोळ्यां समोर दयनीय अवस्थेला पोचलेली आहेंत हे सुद्धा आढळून येताना दिसते. तेव्हा या प्रगतीपथावर असलेल्या व विकसित देशां तील मानवाला काय सुचवावे? हाच प्रश्न एक समस्या आहे. मानव शेवटी पूजा-पाठ, दान-धर्म, कर्मकांड, तीर्थयात्रा या धर्माच्या नवीन रुधींचा वापर अमलात आणणे म्हणजेच गौरवाचा विषय मानून बसलेला आहे. पण त्यांची हि समज व हे ज्ञान म्हणजे जेष्टांची उपेक्षा करून त्यांना निष्फळ व पाप प्रवृत्तीला मिळवीत आहे. हे त्यांच्या कधी लक्षात येणार कां? म्हणूनच मनुष्यत्व हे पशुत्व होऊन बसलेले आहे . असे म्हणायला काहीच हरकत नाही.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा