अग्नीबाणाचा शोधक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
जन्म-इ. स. १९३१रामेश्वरमधील कनिष्ठ मध्यमवर्गात जैनुलद्दीम कलाम या अशिक्षित पण बहुश्रुत पित्याच्या व सहनशील मातेच्या पोटी अब्दुल कलाम यांचा जन्म १९३१ साली झाला. रामेश्वरम ते धनुष्कोडी असा प्रवास करणाऱ्यांचे नाविकाचे काम करणे हा वडिलांचा व्यवसाय. सीताराम कल्याण या वार्षिक महोत्सवात रामाची मृर्ती आणण्याचा मान त्यांच्या नावेला मिळत होता. ते धार्मिक वृत्तीचे होते. शिवमंदिराचे मुख्य पुजारी पाक्षी लक्ष्मणशास्त्री हे त्यांचे घनिष्ट मित्र. त्या दोघांची आध्यात्मिक चर्चा ऐकण्यात कलामचे बालपण गेले.
सर्वधर्मसमभावाची शिकवण लहानपनापासुन त्यांचा मनावर ठसलेली होती. प्राथमिक शिक्षण आटोपून पुढील शिक्षणानंतर त्यांना हवाई दलात जायचे होते. त्याआधी भौतिकशास्त्रातील पदवी घेऊन त्यांनी मद्रास (चेन्नई) इन्स्टीटयूट ऑफ टेकनोलॉजीत प्रवेश घेतला. तिथे त्यांनी एरोडायनॉमिक्सचा परिचय करून घेतला व उड्डानाच्या क्षेत्रातच जीवन व्यतीत करण्याचा निर्धार केला. पण हवाईदलात त्यांना प्रवेश मिळाला नाही. स्वामी शिवानंदांशी त्यांची भेट झाली. ”तुझ्या नशिबी याहीपेक्षा काहीतरी उदात्त आहे.” असे ते म्हणाले. पुढे ते संरक्षण आणी उत्पादन विभागाचे प्रमुख बनले. व १९५८ साली ज्येष्ठ वैज्ञानिक अभियंता बनले.
त्यांनी संपूर्ण देशांतर्गत बनावटीचा हॉवरक्रफ्टचा आराखडा तयार करून तो संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्णमेनन यांना दाखविला व एका वर्षात त्यांनी हॉ वरक्रफ्टचा तयार केली. ‘नंदी’ हे त्यांचे नाव. पण प्रयोग पाहून आणखी उच्च प्रतीची हॉवरक्रफ्ट तयार करण्याची संधी मात्र मिळाली नाही. पुढे डॉ. विक्रम साराभाई यांच्याशी त्यांचा स्नेह जमला.
अमेरिकेत टिपू सुलतानच्या युद्धतंत्रातील एक अग्निबाण पाहून त्यांनी अग्निबाणाच्या निर्मितीचे संशोधनात्मक काम सुरु केले. रोहिणी या उपग्रहाणे सुरु झालेल्या हा प्रयत्न पृथ्वी,अग्नी, आकाश, नाग अशी विविध पल्ल्यांची क्षेपणास्त्रे तयार करून थांबला. त्यांचा वैज्ञानिक प्रवास आता उपग्रहांपर्यंत पोहोचला आहे.
डॉ. साराभाई, प्रा. मेनन,डॉ. राजा रामण्णा,डॉ. धवन, डॉ. ब्रम्ह प्रकाश यांचे कर्तुत्व व सहकार्य यांचा त्यांनी आपल्या आत्मचरित्रात कृतज्ञतापुर्वक उल्लेख केला आहे. ”मला भाषणे करणे जमणार नाही, पण उपग्रहाला कवेत घेऊन ताशी २५ हजार कि. मी. च्या वेगाने जाणारा अग्निबाण बनवायला सांगा, ते जमेल” एका सभेत ते उद्गारले. त्यावेळी ते इंदिरा गांधीसह त्या सभेत उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून त्यांना मानवंदना दिली.
त्यांच्या या उत्तुंग कार्याबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वाच्च नागरी पुरस्कार देऊन महान गौरव केला.
2 Comments. Leave new
we can follow the great thoughts of Dr abdul kalam. he is great leader.
Abdulji was great person and great scientist. he create a history for us. we can declare him as a national leaser and we need to add his chapter in books.