निर्व्याज प्रेमाचा महासागर
भगवान येशुख्रिस्त
जन्म – इसवीसणाची सुरुवात
येशू स्वतः स परमेश्वराचा पुत्र मानत. भक्ती, सेवा, त्याग ही त्यांचा जीवनाची त्रिसूत्री होती. ईश्वरी भक्तीवर त्यांची नितांत श्रद्धा होती. भगवान येशु म्हणजे प्रेमाचा अथांग सागर. मानव सेवेचा – त्यागाचा मूर्तिमंत पुतळा. ‘आम्हांला रोजची भाजी – भाकरी दे. आम्हाला मोहाला बळी पाडू नकोस. अमंगलापासून आम्हांला वाचव’ एवढीच त्यांची ईश्वराजवळ मागणी असे.
पापाचा द्वेश करा, पाप्याचा नको. ही येशुंची महान शिकवण आहे. श्रद्धा हा येशुंचा स्थायीभाव होता. मानवसेवा हे त्यांचे कर्म होते. दिन दलींताचे ते कैवारी होते.
परमेश्वरावर येशुंची नितांत श्रद्धा होती व या श्रद्धेमुळेच त्यांचे क्रूसावरील बलिदान अमर झाले. एका मेंढ्यापाळाच्या झोपडीत जन्मलेले येशु आई – बहीण – भाऊ ही नाती विसरून शेजाऱ्यावरही प्रेम करा म्हणून सांगतात.
ईश्वर दयाळू आहे. तो सर्वांना क्षमा करतो. असे येशु सर्वांना सांगतात.