दुःखितांचे कैवारी बाबा आमटे
जन्म -२६ दिसेंबर १९१४
मृत्यू – मुरलीधर देविदासपंत आमटेविदर्भातील एका श्रीमंत जमीनदार कुटुंबात ‘मुरलीधर’ चा जन्म झाला. तो अतिशय हुशार होता. लहानपणी प्रसिद्धी बंगाली कवी म्हणून रवींद्रनाथ टागोर यांचे ‘गितांगली’ हे पुस्तक वाचनात आल्यामुळे त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. दीन – दुबळे, पीडीत यांच्याविषयी त्यांच्या मनात करुणा व प्रेम झाले आणि ”खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे” ही कल्पना त्यांचा मनात मूळ धरु लागली.
ते जरी एम. ए. एल. एल. बी. झाले होते तरी सामाजिक कामाची आवड अंगी असल्यामुळे भंगीकाम, सुतकताई, सार्वजनिक रस्त्याची सफाई आदी ते स्वतः करीत व इतरांना त्यासाठी प्रवृत्त करीत. या काळात ‘श्रमाश्रम’ स्थापन करून सामाजिक व आर्थिक विषमता नष्ट करण्याचा प्रयोग त्यांनी केला होता.
एके दिवशी ते असेच काम करीत असताना तुलसीराम रामाचा महारोगी रस्त्याचा बाजूला पडलेला दिसला. त्यांच्या जखमातील आळ्या पाहून त्यांना किळस आली, पण लगेच त्यांनी स्वतः सावरले. त्यांनी तुळशीरामाला स्वतः बरोबर नेले. सर्व कामे सोडून त्यांनी महारोग्यांची सेवा करण्याचा त्यांचा निश्चय केला.
१९५४ साली कुष्टरोग निवारण कार्यासाठी १०० एकर जंगलातील जमीन मिळवून ६ कुष्टरोगी, एक लंगडी गाय, पत्नी साधनाताई व दोन मुले यांना घेऊन ‘आनंदवन’ निर्माण करण्यासाठी तेथे गेले. या काळात ते बाबा आमटे झाले.
आनंदवनाचे उद्घाटन ऋषी विनोभा भावे यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते म्हणाले होते की,”आता येथे सेवेचे रामायण घडेल. बाबा सगळ्या जगाकडे पाठ फिरवून जंगलात आले होते त्यावेळी ”जगापुढे तू पाठ फिरवली आहेस एक दिवस असा येईल की, जग तुझ्या पाठीशी येईल. ही भविष्यवाणी अक्षरशः खरी ठरली आहे. संपूर्ण जगाने त्यांच्या कुष्ठरोग विषयक कार्याचे कौतुक केले आहे.
आनंदवनच्या खडकाळ जमिनीत कुष्टरोग पीडितांनी विहिरी खणल्या आहेत. आनंदवनच्या ४५६ एकर जमीन ओलिताखाली आहे. त्यठिकाणी सर्व धान्ये, तेलबिया, फळे यांचे उत्पादन घेतले जाते. कुष्ठरोग्यांनी स्वावलंबी असावे म्हणून बाबांनी तेथे विशिष्ठ पद्धत बसवली, शेती बरोबरच दुधाचे उत्पादन, कोंबड्यांची जोपासना,अंड्याचे उत्पादन,रेशीम उदयोग, फुलांची शेती, वनशेती इ. अनेक उद्योग हे कुष्टरोगी करतात.
कुष्ठपीडितांनी निर्माण केलेल्या अनेक कलात्मक वस्तू आपण थक्क होऊ. बाबांनी या आनंदवन परिसरात प्राथमिक शाळा,मूक-बदीर शाळा विज्ञान-कला-शेतकी महाविद्यालये सुरु केली आहेत. आनंदवन येथील दवाखाना बाबांचे सुपुत्र डॉ. विकास व त्यांच्या पत्नी डॉ. विकास व त्यांच्या पत्नी डॉ. भारती पाहतात. हेमलकसा येथील आदिवासीसाठी बाबांनी फार मोठे काम केले आहे.
या कामाबद्दल बाबांना अमेरिकेतील ‘डेमियन डेरेन पारितोषिक’, म्यगसेसे अवार्ड,फाय फाउंडेनचा राष्ट्रभूषण पुरस्कार,भारत सरकारचा पद्मश्री – पद्म विभूषण पुरस्कार सम्मानपूर्वक बहाल केले गेले आहेत.