Just as there are universal laws that govern the world of nature, there are basic principles that govern our personal lives and relationships. we must have to carry some Principles in life and Have to inspect these principles every time. read this article based on principles and Inspections.
तत्व साधना
चित्ताच्या एकाग्रतेत स्वर आंत येतेवेळी ‘स;’ व स्वर बाहेर जातांना ‘ह;’ असा सो:हं शब्द स्पष्ट ऐकू येतो. प्राणवायूच्या या स्वाभाविक आंत-बाहेर येणाऱ्या व जाणाऱ्यां स्वरांतील प्राण म्हणजेच ‘सो:हं’ हा उच्चार करून तत्वाभ्यासाला सुरवात करावी. म्हणजे चित्ताची एकाग्रता होते. तत्वांचे ज्ञान होण्याला चित्ताची स्थिरता पाहिजे. हे कार्य एकाग्रतेने होते. चंचल चित्तांत तत्व परीक्षा तंतोतंत होत नाही. तत्वभ्यासात ‘सो:हं; या मंत्राचा जप केल्यास इच्छिततत्व उदित करण्याचे सामर्थ्य साधकाला प्राप्त होते.
तत्व निरीक्षण
जितके स्वरांचे ज्ञान स्वरोद्य शास्त्रात महत्वाचे आहे. किंबहुना त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे पंचतत्वाचे ज्ञान असणे जरुरीचे आहे.अचूक ज्ञान होण्यास स्वर व तत्व यांची सांगड लागते. स्वर व तत्वे यांची सांगड असणे म्हणजे दुधात साखर पडल्यासारखेच होय. कोणत्याही नाकपुडीतून श्वास वाहात असो, माणसाला नाकपुडील श्वासाच्या स्पर्शा वरून तत्वे ओळखीता येतात. पण अभ्यासानेच हि गोष्ट सुसाध्य आहे. नाकपुडीच्या अगदी मधोमध श्वास वाहत असेल तेव्हां पृथ्वीतत्व; नाकपुडिंच्या तळाला स्पर्श करून खाली वायू वाहत असेल तर जलतत्व; नाकपुडीच्या वरच्या भागास वायू स्पर्श करून वाहत असेल तर अग्नीतत्व; श्वासाची गती उच्छवासाच्या वेळेस तिरकस असेल तर तेंव्हा वायुत्त्व; आणि संक्रमण असेल तर आकाशतत्व; समजावे. तसे स्वरांचा संधीकाल लवकर लक्षांत येतो पण तत्वांचा संधीकाल समजण्यास अभ्यासाचें काम आहे.
तत्वांचे प्रमाण आणि रंग
पृथ्वीतत्व २० मिनिटे, आपतत्व १६ मिनिटे, तेजतत्व १२ मिनिटे, वायूतत्व ८ मिनिटे, आकाशतत्व ४ मिनिटे, अशी पाचतत्वे सुर्योदयापासून १ तासाच्या अवधीत अनुक्रमाने परिभ्रमण करीत असतात. या तत्वाचे ज्ञान होण्याकरिता षण्मुखी मुद्रा करावी. म्हणजे दोन्ही कानांत दोन हातांचे अंगठे ठेवून दोन्ही नाकपुड्यांवर दोन्ही मध्यमा ठेवाव्यात व तर्जन्यांनि दोन्ही नेत्र झाकून, राहिलेल्या बोटांनी मुखाचे प्रांत झाकावे. अशा रीतीने सहाही छिद्रे शोधणे हीच षण्मुखी मुद्रा होय. हि केली असतां तींत पिवळा, पंधरा, तांबडा, निळा व चित्रविचित्र असें पांच रंग दिसतात तेंच अनुक्रमे पृथ्वी-पिवळी, आप-पंधरा, तेज-तांबडा, वायू-निळा, आकाश-चित्र-विचित्र असें पाच रंग जाणावे. हि समजण्याची पहिली रीत आता दुसरी रीत म्हणजे — आपला श्वास रोखून तो एका काचेच्या आरशावर सोडावा आणि नंतर त्या आरशावर चतुष्कोण, अर्ध चंद्र म्हणजे द्विकोण, त्रिकोण, वर्तुळ आणि अनेक बिंदू बिंदू मिश्र अश्या पांच आकाराच्या आकृती दिसतील. तीच अनुक्रमे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश अशी पांच तत्वे जाणावी.