आपण स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे!

Like Like Love Haha Wow Sad Angry If you want to change the today’s scenario, so we need to change...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

If you want to change the today’s scenario, so we need to change our view to see women. to need to find a Mother, a Sister in Women. we must have to give respect to the women.

Our view towards women should be changed!आजची परिस्थिती सुधारावयास हवी असेल तर आपण स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. आपल्याला स्त्री मध्ये आई, बहिण, मुलगी, वहिनी दिसावयास हवी. ही पवित्र नाती आहेत. या नात्यामधून कुठल्याही स्त्रीकडे पाहा, हवं तर ओळख काढून बोला, जरूर प्रेम करा. कुठलीही स्त्री या नात्यातील प्रेमाचा स्वीकार करेल यांत शंका घेण्याचे कारण नाही. एक लक्षत घ्या आपली पत्नी ही आपलीच पत्नी असते. एका क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते याचा विसर पडावयास नको. या विषयावर मी अनेकदा माझे विचार मांडले आहेत, आजही मी माझ्या वयानुसार, माझ्या वयाच्या स्त्रीकडे बहिण म्हणून पाहतो, माझ्यापेक्षा जर एखादी स्त्री लहान असेल तर मी तिच्याकडे वहिनी किंवा अगदीच माझ्या मुलींच्या वयाची असेल तर मुलगी मानतो. माझ्या वयाहून जर का एखादी स्त्री मोठी असेल तर तिला आई किंवा बहिण मानतो.

या पवित्र – निर्मल नात्यातून पहिल्या कारणाने मला आई, बहिण, मुलगी, वहिनी मिळालेल्या आहेत. निर्मल – पवित्र नातं निर्माण करण्यासाठी मोठं मन लागतं. असं मन प्रत्येकाकडे आहे. पण बघण्याचा दृष्टीकोन नाहीये. मात्र आता निकोप दृष्टीकोन असणे गरजेचे असल्याने प्रत्येकांनी बदलला पाहिजे असं माझं एक प्रांजळ मत आहे. आजच्या तरुण पिढीला कदाचित माझे हे विचार पटणार नाहीत, हे जरी खरं असलं, तरीही काही कालावधी गेल्यानंतर निश्चितपणे माझी मते त्यांना पटावयास लागतील. तेव्हढी समाज नक्की त्यांना येईल. आज नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमा एकाच दिवशी आहेत. दोन्ही सन आपल्याला आनंदाने, समाधानाने साजरे करावयाचे आहेत. मात्र बहिणींना भावाला राखी बांधावयाची असल्याने योग्य काळ दुपारी एक वाजून चाळीस मिनिटानंतर आहे याची कृपया माझ्या बहिणींनी नोंद घ्यावी. माझ्या मनातील विचार आपल्यासमोर मांडले आहेत जरूर विचार करावा असं मला वाटतं. नारळी पौर्णिमा आणि राखी पौर्णिमेच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. हरी ओम.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories