आनंदाचा मुळ प्रवाह

Like Like Love Haha Wow Sad Angry Source of happiness and Happy Life: Find something related with the source of...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Source of happiness and Happy Life: Find something related with the source of Happiness and How make Life Happy. Here are some Basic Principles of Happiness.

  1. Focus on fulfillment.
  2. Spend more time in your values.
  3. Set your own happiness level.   Read More ….

आनंदाचा मुळ प्रवाह — आपल्याच आत आहे

Source of Happinessआत्म्याच्या प्राथमिक आकांक्षाचे नाव आनंद आहे. मनुष्यापासून किड्या मुंग्या पर्यंत जितकेकाही प्राणी आहेत हे सर्वच आनंदाची इच्छा करतात प्राण्यांचे जीवनच आनंद आणि त्याच्या आशा आकांक्षेवर अवलंबून आहे. मनुष्य स्व:त आनंद स्वरूप आहे जगाच्या मायाजाळा समोर त्याचे हे मुळ स्वरूप तो  विसरला आहे. तो त्यालाच शोधण्याचा व मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे त्याचा संपूर्ण जीवनाचा मुख्य उद्धेश आनंद प्राप्त करण्याचाच आहे मनुष्य जेव्हा सुखभोगा मध्ये गुंग असतो. तो आनंदासाठी विनम्र बनून कष्ट घेतो तर ते सुद्धा आनंदाच्या आशेने. आनंद सर्वांचीच आवश्यकता आहे. आनंद हे दोन प्रकारचे असतात असे मानले गेले आहे. एक म्हणजे उत्कृष्ट आणि दुसरे निकृष्ट ज्यांना अध्यात्मिक किंवा आत्मिक तसेच सांसारिक किंवा विषयिक म्हटले जावू शकते. आनंद आणि सुख शांतीची इच्छा तर सर्वच करतात परंतु आपल्याला जो पाहिजे असलेला आनंद तो कोणता आहे. कोणत्या श्रेणीचा आणि कोणत्या स्तराचा आहे. या विषयी फार कमी व्यक्ती समजू शकतात. मनुष्याला पाहिजे असलेला आनंद वस्तूत:अध्यात्मिक आनंदच आहे. पण मनुष्य त्याला विसरून  संसारिक आनंद शोधण्यातच जीवन घालवितो. संसारिक किवा विषयिक आनंद मृग तृष्णे सारखा खोटा आणि अतृप्ती देणारा असतो आणि अध्यात्मिक आनंद हा खरा सत्य व वास्तविक असतो. हा मिळाल्यास आनंदाची इच्छा पूर्णपणे तृप्त होवून समाधान व शांती लाभ होतो. त्या करीता याच आनंदाचा संग्रह करावयास हवा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories