विचार सारणी…… प्रा. श्रीकांत भट
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Seeding of thinking: Every Day we get up with new ideas and Thinking. it is very important of seeding proper thinking in your mind. good ideas make your Mind Clean. This article will gives information about VicharSutra. Article of Prof. Srikant Bhatt.

संस्काराची पेरणी…..

VICHAR SARANIआजच्या धावपळीच्या युगात पालकांना मुलांसोबत बसायला,बोलायला, खेळायला, अभ्यास घ्यायलावेळ देणं शक्य होत नाही.आजी-आजोबा असले तर निदान शाळेतून घरी आल्यावर कुलूप बंद घर मुलांना पाहावे लागत नाही. शाळेतून आल्या बरोबर तिथे घडलेल्या घटना शेअर कराव्यात, असं मुलांना वाटतं आणि बालिश बडबड ऐकावी व त्यात सहभागी व्हावं असे आजी-आजोबां यांची सुद्धा अपेक्षा असते. मुलांच्या या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर कुठे व्यक्त करणार ते स्वत:ला ?मग पाहता पाहता मुलं मिटून जातात मधून मधून महाभारत, रामायण, विज्ञान, तसेच पशुपक्षांच्या गोष्टीमधून नवे आदर्श मनात उभे राहतात.गोष्टी सांगता सांगता तुमची -त्यांची जवळीक निर्माण होऊ लागते. तसेच सायंकाळी खेळून झाल्यावर हातपाय धुवून देवापुढ बसणं शुभंकरोति म्हणणं हे दृश्य केवळ पुस्तकांतच लिहिलयं कि काय असा प्रश्न पडतो. खरं तर मुलांवरील संस्कारासाठी या बाबी महत्वाच्या ठरतात, वास्तविक हे सहजं व सुलभगत्या होणारे संस्कार आहेत. मोठ्यांच्या सगळ्या वागण्या-बोलण्यातूनच संवेदनशील-संस्कार पिढी तयार होते. सुरवातीलाच मनाची खंबीर चौकट तयार झाली की, हीच मुलं बाहेरचे टक्के-टोणपे खायला तयार होतात, व पुष्कळस बाहेरील चांगलं टिपण्यासारख टिपू शकतात. त्यांत नीर-क्षीर न्यायाचा विवेक भरपूर तयार होतो, म्हणून संपूर्ण शक्तीनिशी बालमनावर संस्कारबीज पेरली गेली पाहिजे.

आपण नेहमीच अशा घटना आकर्षित करतो. ज्या स्वत:च दर्शन करवितात. त्या आपल्यातील उणीवा दाखवितात. आपल्या कमतरतेकडे निर्देश करतात. त्या घटना म्हणजे जणू आपला आरसाच आहे. हा आरसा म्हणजे हे जग… हा संसार आपल्या आसपास वावरणारे लोक… दररोज प्रत्येक घटनेत मनात उपजणारे विचार … हे विचारच आपला वैचारिक साचा ठरवतात. आपले विचारच आपल्या विश्वाला आकार देतात. लोक आपल्याला मदत करत नाही, अशी जर तुमची तक्रार असेल, तर आपण नक्कीच स्वत:ला मदत करीत नाही असाच याचा अर्थ होतो. तुम्ही इतरांशी वाईट वागता असे नव्हे तर आपण स्वत:शीच योग्य व्यवहार करीत नाही, हाच अर्थ होतो.

बाहेर ज्या ज्या गोष्टी घडत असतात त्या सर्व आपल्या अंतरंगातील मनोभावनेचा आरसा आहेत. म्हणून जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करेल, तेव्हा अंतरंगात डुबकी मारण्याची हीच सुसंधी असं समजायला हरकत नाही. या संधिचा फायदा आपण स्वत:ला कुठे कुठे दुर्लक्षित करीत आहोत, याचा प्रथम शोध घ्यायला हवा. आंतरिक रुपात असं करायचं जेव्हा आपण बंद कराल तेव्हाच बाह्य जगात परिवर्तन घडण्याची शक्यता असते.

आपल विश्व एखाद्या स्क्रीन प्रमाणे आहे जिच्यावर आपण आपले मानसिक दबाव, उणीवा,द्विधा मन:स्थिती यासारख्या गोष्टी प्रदर्शित करतो. त्याचचं हे जग प्रतिबिंब आहे कारण संसार हा एक पडदा आहे ज्यावर आपण आपले गुण, द्विधाभाव आणि कमतरतेच प्रक्षेपण करतो… आणि मग आपल्याला तेच विश्व दिसू लागतं, जे वास्तवात आपल्याद्वारे प्रेषित चित्राच प्रतिबिब असतं ‘तेथे’ कोणतही स्थायी विश्व नसून आपल्याच द्वारे निर्मित असचं विश्व असतं. दैनंदिन जीवनात आपण सतत आपल्या विश्वाला आकार देत असतो. लोक वातावरण, ऋतू, परिस्थिती यात आपण त्याचा  अनुभव करतो. आपण यात सजग नसलो तरी अनायासपणे हेच घडत असतं.

जर आपण सजगतेन आपल्या दैनंदिन जिवनाच निरीक्षण केल तर आपल्या अंतर्यामी नेमक काय  चालल आहे, हे ज्ञात होईल आणि असं केल्याने आपला दृष्टीकोन बदलेल आणि आपल्या विकृतिंमधून मुक्त होण्याची शक्यता अधिकाधिक विकसित होईल, व ईतरांना दोष न देण्याची कला प्राप्त होईल. जेव्हा तुम्ही बदललात कि सर्व जग बदलताना दिसेल कारण तुम्ही बदलून त्यांच्या साठी पोषक वातावरण निर्माण केलेलं असेल.

गीता…… आयुष्यासाठी:  भारतवासी हिंदूंसाठी अति मोलाचा संदेश …

आम्ही भारतवासी हिंदू गीतेकडे केवळ एक धार्मिक ग्रंथ याच भूमिकेतून पाहून धन्यता मानत आहोत.पापक्षालनासाठी असणार्या या चैतन्यदायी ग्रंथाची न्यायालयातून अधिकृतपणे गीता हातात घेवून, खोटे बोलून, खोटी साक्ष देवून गीतेची रोजच विटंबना करीत आहोत याचेही भान हिंदूंना उरलेले नाही हा प्रकार आम्ही हिंदू कधी थांबविणार आहोत? गीते एवजी दुसरा एखादा ग्रंथ हातात घेवून आम्ही असे करू शकतो का? दररोज होणारा हा गीतेचा अपमानच नाही का? गीतेची चाललेली घोर विटंबना हिच भारताच्या नैतिक व अध्यात्मिक अधोगतीसाठीची धोक्याची घंटा ठरत आहे. वकील मंडळींनी यावर आक्षेप घेवून न्याय प्रणालीत सुधारणा घडवून आणत, गीतेला कोर्टातून बाहेर काढून भक्तांच्या मंदिरात गीता ठेवण्याचे काम करावे, म्हणजे भारताला पुन्हा वैभवशाली होता येईल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu