‘सो$हं’ मंत्राचे वैशिष्ट
Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

So Hammm Mantrache UddishtaSohm its a spiritual Word. With Sohm Chant we can create internal Energy.  This word used for internal meditation purpose. This Marathi Article will gives you complete ideas about Sohm Chant.

जसा वटवृक्ष सुक्ष्मरूपाने त्यांच्या लहानशा बीजांतच त्या बीजाच्या शक्ती वरच उभा असतो. तसेच सर्व विश्व ह्या सो$हं मंत्रात साठविलेले आहें. ब्राम्हण, क्षत्रिय,वैश्य अथवा शुद्र ह्या चार वर्णापैकी कोणीही शुचिर्भूत असो किंवा सोवळा-ओवळा कशाही प्रकारचा असो. परंतु सो$हं मंत्र जपणारा साधक तो मुक्त आहें, चालताना, उभे असताना, मल-मुत्र करताना, जेवताना, झोपताना, स्वप्नांत, एवढेच नव्हे तर मैथुन करताना सुद्धां हा सो$हं मंत्र जपला तरी तो निष्फल होत नाही. *हा सो$हं मंत्र सर्व मन्त्रांचा राजा असून शीघ्र फलदायी आहें. हा सो$हं मंत्र साधक ज्ञानी अथवा अज्ञानी असो, सो$हं-सो$हं-सो$हं असे सतत भजन केल्याने सायुज्य मुक्ती प्राप्त होते. सो$हं  मंत्र जपणारा साधक जेथे राहतो ती जागा, ते गाव, सिद्ध क्षेत्र जाणावे.  या सो$हं मंत्राच्या ध्यानाने, धारणेने साधक ज्योर्तिब्रम्हाप्रत जातो. असा हा सो$हं मंत्र, मंत्रराज होय.

*सो$हं म्हणजे सत्-चित-आनंद – “सत् चित्तां नंद मय” आहें. सो$हं म्हणजे शिव-शक्ती होय, त्यातच मुक्तीचा वास आहें. असा हा सो$हं मंत्र परम् अध्यात्मिक ज्ञान आहें. परम तप आहें. परम-ज्ञान, परम-पूजा, परम-दीक्षा, परम-तप, परम-सत्य, परम ध्यान, परम-व्रत, परम-यज्ञ, परम-फल, परात्पर-परब्रम्ह आहें. तसेच सो$हं परमोच्च ध्येय, परम गुह्य, सर्व सारांचे सार आहें यात किंचितही शंका नाही. हे जप करताना साधकाने कोणतेही आसन घालावे व स्वस्थ पडून राहिले तरी चालेल.  यामुळे मनाची मानसिक एकाग्रता होवून श्वसन क्रिया आपोआप आटोक्यात येते. एकाग्रतेमुळे श्वसन क्रियेवर सहज ताबा होतो. आणि कुंडलिनी शक्ती जागरूक होवून ज्योर्तीब्रम्हाचे दर्शन होते.

सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय सो$हं परमात्माच करतो. तो सो$हं ज्योर्तीब्रम्ह परमात्मा त्रिकूटाचें वर द्शवेद्वारीं दिव्य तेजोमय जोर्तीस्वरूपात स्थित आहें. त्याच पासून आकाश उत्पन्न होत असतें. आकाशापासून वायू निर्माण होतो, वायूपासून तेज निर्माण होतो, तेजापासून जल निर्माण होते, जलापासून पृथ्वी, पृथ्वीपासून सर्व भूतें म्ह्नजेच जीव-सृष्टी निर्माण झाली. याच प्रमाणे सो$हं परब्रम्ह सर्व विश्वव्यापी आहें. सर्व गर्भांत असणारे सो$हं हेचं मुख्य परमाणु बीज होय.

ज्या दिवशी मातृ गर्भात विर्यबिंदू पडतो त्याच दिवशी त्यापासून होणाऱ्या प्राण्याच्या ‘ब्रम्ह लिखितं-प्रमाणे’ सुख-दु:खाची आणि हानी-मृत्यूची, सुरवात होते. ह्यातून मुक्त होण्याकरीता सो$हं मंत्र हा सर्व प्राणी मात्रांस मोक्ष देणारा होय. त्याचे वर्णन करिताना वेद स्तब्ध झालेंत, चित्त थकले, मन अमन झालें अशा या सो$हं मंत्राचा अधिकार सर्व जातींच्या नर-नारीं ना समान आहें. त्याकरिता सर्वांनी सो$हं मंत्राचा जप करून आपले आत्महित,परमहीत साधावे. सर्व मंत्रामध्ये सर्वोत्तम सर्व श्रेष्ठ मंत्र आहें, राजराजेश्वरी विद्या आहें. हिच्याहुन श्रेष्ठ विद्या दुसरी कोणतीही नाही, हिचा महिमा अपार आहे.

सो$हं ब्रम्ह हा सर्व प्रकाशित ज्योर्तीरूप परमात्मा सर्व भूतांमध्ये तो सर्व व्यापी आहें. सर्व भूतांचा अंतरात्मा, व आधार आहें.बुध्यादिकांचा साक्षी, चैतन्यरूपी, निर्गुण आहें. त उपाधीशून्य असल्यामुळे त्याला महाकैवल्यब्रम्ह म्हणतात.

सो$हं ज्योर्तीब्रम्ह स्वरूप कळले नाही, तर सर्व शाब्दिक ज्ञान व्यर्थ आहे. ‘मी’ माझे या अज्ञान जण्य भ्रमामुळे मानवप्राणी व्यर्थ भ्रमात पडतो. मृतिका एकरूप असते, पण तिचे भांडी अनेक रूप धारण करतात. गायीचे दुध शुभव एकरूप असते पण तिचे वर्ण अनेक असतात. सुवर्ण एक असते पण त्याची आभूषणे अनेक असतात. तद्वत  सो$हं ज्योतिरूप परमात्मा सर्वांमध्ये एकच आहें पण शरीरे मात्र अनेक आहेतं. *सो$हं मंत्र घेण्यासाठी  संन्यासच घ्यावयास पाहिजे असे नाही, किंवा प्रपंच सोडावयास पाहिजे असेही नाही, अथवा ब्रम्हचारी असावयास पाहिजे असेही नाही. त्याला जातपात नाही. हा सर्व श्रेष्ठ सो$हं मंत्र घेण्याचा सर्वच नर-नारीं ना अधिकार आहें.  तोच मोक्षाचा आधारस्तंभ होय. तो नित्य तृप्त असल्याने त्याला नैवेद्याची गरज नाही. त्याच्या प्राप्तीसाठी शुद्ध सद् भावनेची आवश्यकता आहे. शुद्ध सद् भावनावाचून ज्ञान प्राप्त होत नाही. या मंत्राने सर्व प्राणी मात्र मुक्त होतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu