A person who loves god, God Also loves him. That person enjoy the light of divine love is a pleasure. living life its a game. and spirituality makes that game into Fun. When any negative thoughts that come to the same spirituality and how it was for you to use. This article teach you how to live life with fun and Enjoyment. fun is very important in life.
भक्तीने जी व्यक्ती ईश्वरावर प्रेम करितात, ईश्वरही त्यांच्यावर प्रेम करतो.हा तेज प्रेमाचा आनंद म्हणजेच ईश्वरीय आनंद होय.जगात जीवन जगणे म्हणजे हा एक सापसीडी चा खेळ आहे. आणि अध्यात्म्यात त्यातील सापाला शिडी बनविण्याच सामर्थ्य आहे. अध्यात्म हेच सांगत कि कोणताही नकारात्मक विचार जेव्हा आला त्याचा कसा फायदा करून घ्यावा. याचाच अर्थ सापाला शिडी बनवून घेणे. पुढच म्हणजे आपल्या जीवनात येणारी कोनतीही घटना असो वा प्रसंग असो त्यापासून बरेच काही शिकण्या सारखे असते, त्यापासून धडे धेतल्या जावूं शकतात. तेव्हाच प्रगतीच्या मार्गाने आपण जावू शकतो. व विकासाची पाउले मजबूत होतात. आपल्या आयुष्यातील निराशा, ताण, चिंता हेच जीवनातील साप आहेत खरा आनंद मिळण्यासाठी हेच अडथळे करतात.
बरेच लोक जीवनात निराश होतात पण निराश होणे म्हणजे काही वाईट नाही हे तर मह्त्वाचेच आहे. पण निराश झाल्यानंतर मार्ग शोधणे हे सुद्धा महत्वाचे आहे. त्या निराषेत त्या तणावातच पुढच्या आनंदी जीवनाची सुरवात असते, तेच आपल्याला शोधायचे असते.हे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे. दु:खी न होता त्यात असली सत्य शोधण्याचा प्रयत्न करावा लागतो. आपल्या विचारात बदल करण्याची तीच संधी असते. मनावर कधी ताण आला तर कधीच घाबरू नये. आपल्याला राग का आला? आपल्या मनावर ताण का आहे? या अनिष्ट प्रश्नांचे उत्तर शोधायचे. ते उत्तर तुम्ही शोधलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कि बरे झाले कि मी निराश झालो त्यामुळेच मला माझ्या विकासाचा मार्ग सुचला, आणि आज मी माझा विकास करू शकलो. त्यालाच म्हणतात सापाला शिडी बनविणे. त्याच शिडीने आपण उन्नतीच्या शिखरावर चढू शकतो. शिडीने तर आपण वर चढतोच पण सापाला शिडी बनवून म्हणजे निराशा, ताण, चिंता यातून मार्ग शोधून विकसित होणे, याचा आनंद काही वेगळाच असतो.