शक्तिशाली जीवनाकडे वाटचाल




Like
Like Love Haha Wow Sad Angry

An exploration of strength, faith, body, mind, spirit, God, and life. A chronicle of my journey, highs and lows as honest as I can make them. Being Mentally StrongBeing Physically StrongBeing Spiritually Strong Strength implies having power and being able to affect one’s own life. An exploration of strength, faith, body, mind, spirit, God, and life. Read this article on The Strong Life.

strong_start_in_life1मनुष्याला जर शक्तिशाली जीवन जगायचे असेल तर त्यासाठी एक अगदीच सहज सरळ कार्ययोजना म्हणजे त्याने आपल आयुष्य शुभ विचारांनी भरून टाकावं. बस्स… जेथे ‘स्रोत’ किंवा ‘चैतन्य’ यां सारखे शब्द लोकांना कठीण वाटतात तेथे ‘आनंदी विचार’हे वाक्य पुरेस ठरतं. या वाक्यातील विचार हा शब्द तिसऱ्या आयामाकडे निर्देश करतो आणि आनंदी हा शब्द चौथ्या आयामाकडे संकेत करतो. परम चैतन्यात स्थापित झाल्यांनतर जी अवस्था प्राप्त होते, त्याला ‘आनंदी अवस्था’ असं म्हटलं गेलेलं आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या स्रोताशी जोडलं जाणं म्हणजेच ‘आनंदी’ होणं होय. फार तर याला आपण अध्यामिक वा अस्तित्वगत पैलू असंही म्हणू शकतो. हा आपल्या अस्तित्वाचा तो गुण आहे जो आपल्या कार्यांची,भावनांची आणि विचारांची गुणवत्ता सिद्ध करतो.

खरंतर विचार, भावना आणि आपल्या कार्याचा स्रोत चेतनाच आहे. परंतु या महत्वपूर्ण चौथ्या आयामाला सर्व श्रेष्ठ दर्जा न देता लोकांनी तिला अगदीच नगण्य मानलेलं आहे. काही लोक याला ‘सेल्फ’ म्हणतात तर काही ‘अस्तित्वाचा अनुभव’ पण काही लोकांनी ‘अस्तित्व’ वा ‘चेतना’ अशी संबोधतात. वास्तविक हि आपल्या जिवंतपणाची जाणीव, अनुभूती आहे. माणूस जेव्हा स्वानुभवावर जातो तेव्हा विचार, भावना आणि कार्यांना दिशा देणं अतिशय सुलभ होत. आणि हाच आपला खरा स्वभाव असल्याने तिथंर्यंत पोचणं हे आपलं लक्ष ठरतं. आणि हीच आपली खरी अवस्था आहे. येथे स्थित राहून आनंदी, स्वाभाविक अवस्थेत कार्य करणं सहज शक्य होतं, म्हणून अनैसर्गिकता  दूर करून माणसानं आपल्या खऱ्या स्वभावातच राहायला शिकायला हवं यालाच प्रयासरहित प्रयास असंही म्हटलं गेलंय.

आनंदी आणि शुभ विचार हे केवळ साध्यच नसून साधन मार्गही आहेतं हे आपल्याला सदैव लक्षात ठेवायचं आहे म्हणूनच नेहमी स्वत:ला सांगा. नकारात्मक विचारसरणी अतिशय वाईट  असल्याने आता  मी स्वत:ला आशा आणि भक्तीची सवय लावीत आहे. ती माझ्या समस्येच समूळ उच्चाटन करेल. य़ा सवयीने माझ्यातील सृजनात्मक,सकारात्मक आणि सत्यात्मक विचार जागृत होतील मग चिंतेसाठी माझ्या डोक्यात थोडीही जागा शिल्लक राहणार नाही ‘ . चला तर मग या मानसिक व्यायामाद्वारे मौनायामापर्यंत पोहोचण्यासाठी विचारायामाचा जो पूल आहे,तो पार करून या तिराहून त्या पैलतीरावर जावू  या

शक्तिशाली ‘आनंदी विचार’

प्रश्न १ – तुमचं एक सकारात्मक वाक्य संपूर्ण जग लक्षात ठेवू शकेल काय ?

प्रश्न २ – तुमचा एक सशक्त, प्रबळ विचार विश्वाला नवीन दिशा देवू शकतो का ?

प्रश्न ३ – तुमचं एक दमदार लक्ष विश्व बदलू शकतं का ?

या प्रत्यक प्रश्नाचे उत्तर जर ‘हो’ असू शकतं, असा संकल्प जर तुम्ही केलात, ‘आज मला दिसणाऱ्या किंवा माझ्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तू विषयी, घटनेविषयी वा लोकांविषयी मी चांगलाच विचार करेन असे ठरवून, सर्वांशी सकारात्मक बोलेन, आशावादी दृष्टीकोनच अंगीकारेण …. ‘

 आता हा संकल्प ठरवून आपल्या मनात नानाविध प्रश्नांची मालिका तयार होवू शकते.… ‘समोरचे लोक जर माझ्याशी चांगले वर्तन करीत नाही तर मीच त्यांच्या विषयी चांगले विचार कां बाळगावेत ?  घटना घडत असतानाही मी सकारात्मक प्रतिक्रिया कश्या देवू शकतो ? ह्या महत्वपूर्ण बाबीच आपल्याला समजून घ्यावयाच्या आहेंत…

‘ समस्या कुठे बाहेर नसून माणसाच्या डोक्यातच त्याच वास्तव्य असतं. ‘आपल्याला स्वत:च्या मेंदुवरच विजय मिळवावयाचा आहे. याचाच अर्थ सर्व अशक्य वाटणारी कार्ये, अडथळा कुठे बाहेर नसून आपल्याच द्क्यात कार्यरत आहे. ज्यावेळी एखादी समस्या  उदभवेल त्यावेळी स्वत:ला, ‘समस्यां चं   वास्तव्य डोक्यातच असल्याने त्याच निराकरणही तेथेच उपलब्ध आहे. ‘हे त्या मनाला सांगायला कदापि  विसरू नका . घटना तर होतच राहणार, परंतु अनवधानाने आपण मात्र त्यांना ‘समस्ये’ च लेबल देतो. पण वस्तू स्थिती अशी आहे, प्रत्येक घटनेला समस्या मानणे हीच मुळ समस्या आहे.  आपल्या आयुष्यात  घटना घडू लागतात, तेव्हा आपल्याला वाटायला लागत, ‘त्या घटनेत समस्या आहे.  कि ईतरां मध्ये समस्या आहे ‘ परंतु समस्येच वास्तव्य आपल्या डोक्यातच असतं आणि याच मूळ गोष्टी पासून आपण अनभिज्ञ असतो.  मग समस्येच मूळ आपल्याच डोक्यात आहे तर उपाय देखील तेथेच नको का शोधायला? म्हणजेच आपल्या जवळ प्रत्येक गोष्ट बदलण्याची शक्ती आहे. आणि हीच समज मनुष्यात वृद्धिंगत व्हायला हवी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा