We should always have Lenient attitude. Read importance of Lenient attitude. if you want to work to be done from other then must behave with Lenient attitude. this article will teach you how your Lenient attitude helps you and others.
क्षमेने दुष्टांचा दुष्टपणा नाहीसा होतो. असा संत आपला अनुभव सांगतात. मनुष्याचे सुंदररूप हा अलंकार असेल तर सात्विक गुण हा रूपाचा अलंकार आहे. क्षमा म्हणजे इतरां वरील असलेला क्रोध व्यक्त न करता त्याला माफ करणे एवढाच अर्थ नाही तर कोणी अवहेलना किंवा अपमान केला असता अंत:करणात क्षोभ निर्माण न होणे याला क्षमा म्हणायचे असेच आचार्यांचे भाष्य आहें. चंदनाच्या वृक्षावर कुर्हाडीचा घाव घातल्या नंतर त्यावर त्याच्या कडून प्रतिक्रिया तर ह्तच नाही उलट कुर्हाडीला सुगंधाचा लाभ होतो. तो हानी करणार्याला आपला गुण देतो. सामान्य मनुष्याला हे एकदम जमले नसेल तरी प्रयत्न करीत राहणे अपेक्षित आहे.
कित्येकदा इतरांच्या लहान लहान चुकांसाठी आपण चिडतो, रागावतो हे जरी काही अंशी टाळता आले तरी कुटुंबातील शांती राखण्यास मदत होईल. पृथ्वीला समा म्हणतात. आपण तिच्यावर किती आघात करतो पण त्यामुळे तिच्या अणुरेणूत असलेल्या मातृत्वात कुठेही उणीव निर्माण होत नाही. म्हणूनच अवधुतांनी (गुरु दत्तांनी ) तिला गुरु केलेले आहे.
आपल्या क्षमाशील वृत्तींचे ओझे न होता क्षमाशील असणे अपेक्षित आहे त्याच्या अनेक पायऱ्या सांगितल्या गेलेल्या आहेत. अपकारांसाठी ईतरांना दंड न देणे, त्यांच्यावर सुद्धा उपकार करणे, ऎत्केच नव्हे तर त्याच्याही सदगुनांचा स्वीकार करणे आणि हे करीत असतां आपल्या सत्क्रुत्याचा गर्व न होवू देणे हि क्षमाशील वृत्तीची साधना वर्णन केलेली आहे. यात जेवढी झेपेल तेवढी आचरणात आणलीच पाहिजे.