This Marathi article will teach you Tricks to Get Attention of others on you. Attention by other people is the most irresistible of drugs. To receive it outshines receiving any other kind of income. if you want to grab the Attention of others on you read this Marathi article. this article will teach you some useful tricks to grab the attention of other people.
वशीकरणशास्त्र म्हणजे सर्व प्रकारच्या व्यवहारात दुसर्याला आपलेसे (वश) करण्याची कला व युक्ती याला वशीकरण म्हणतात. अवघड कामे दुसऱ्यांकडून साध्य करून करण्याकरीता या वशीकरण विद्येचा उपयोग करावयाचा आसतो. आपली थाप दुसर्यांवर पडावी आपल्या मताप्रमाणे हमखास व्हावे असें ज्यांस वाटत असेल त्याने या शास्राचा उपयोग करून लाभ करून घ्यावा.
इडा पीडा टळो ! हि म्हण सर्वत्र ऐकावयास मिळते. पण या म्हणीचे मूळ फारच कमी जणांना ठाऊक आहे ? इडा, पिंगला मिळून ‘सुषुम्ना’ होते. इडा पीडा या वाक्प्रचारांतिल इडा हा शब्द इडा नाडीचा आहे म्हणजे चंद्र नाडीचा सूचक आहे. पीडा हा शब्द ‘पिंगला’ ह्या उजव्या नाडीच्या शब्दाच अपभ्रंश आहे. दोन्हीही स्वर किंवा श्वास एकाच वेळी सुरु असल्यास तीच ‘सुषुम्ना’ होते. हि नाडी व्यवहाराला अत्यंत अशुभ असून ती टळो असे म्हटलेले गेले आहे ते याच म्हणीवरून. हि नाडी फक्त ध्यान धारणेला व परमेश्वरी उपासनेला उपयुक्त असते.
नाडी – ज्ञान !
सूर्य हा सृष्टीचा आत्मा आहे. सूर्य हा या सृष्टीतील प्राणीमात्रांचे पोषक ‘दिव्य ज्ञान आहे. नाडी म्हणजे स्वर म्हणजेच श्वास आणि सर्व विश्वाचे केंद स्थान स्वरांत आहे. स्वर हे प्राणीमात्रांचे जीवन होय. नाभीपासून वरपर्यंत जो अंकुर निघाला आहे. तेंथ पर्यंत ७२००० नाड्या देहांत विद्यमान आहेत. या नाड्यांमध्ये कुंडलिनी नावाची सर्पाकार सर्पाप्रमाणे वेढा घालून असलेली नाडी असते. ‘नाभी कुंडात’ ती घट्टबसलेली असते. ही अत्यंत जाज्वल्य ‘सुप्तशक्ती’आहे. कुंडलिनी ही केवळ पंचमहाभुते आटण्याची ‘मूस’ होय. कोणतीही नाडी प्राणा शिवाय काम करू शकत नाही. नाडी लहान असो वा मोठी त्यांना प्राणामुळे चैतन्य मिळते. विद्युत दिव्यांना वीज त्याप्रमाणे नाड्यांना प्राण आहे.
कुंडलिनी शक्ती तिच्यावर दहा व खाली दहा आणि दोन बाजूने वाकड्या गेलेल्या दोन दोन मिळून एकंदर च्योवीस असून त्यांत बाजूस वाहणार्या दहा नाड्या मुख्य आहे. त्यांचे कार्य याप्रमाणे —
१. इडा नाडी – डाव्या नासिका पुडात श्वास आंत ओढून घेणे. तो पूरक
२. पिंगला नाडी- उजव्या नासिका पुडांत श्वास बाहेर सोडणे. तो रेचक
३. सुषुम्ना नाडी – दोन्ही नासिका पुडांत श्वास सारखाच वाहने तो कुंभक
४. गांधारी नाडी – स्थान डावां नेत्र व कार्य रक्त पुरविणे व दृष्टी देणे परिणाम डोळ्याचे तेज वाढविणे
५. हस्तजिव्हा नाडी स्थान- उजवा डोळा कार्य पाहणे,डोळे उघड झाप करणे व फिरविणे.
६. पूषा नाडी स्थान — उजवा कान कार्य एंकू येणे,परिणाम कानात योग्य आवाजाची व्यवस्था करणे
७. यशस्विनी नाडी स्थान डाव्या कानात कार्य ऐकणे परिणाम सुव्यवस्थित आवाज.
८.अलम्बुषा नाडी – स्थान- मुख -कार्य रुची परिणाम – चर्वितचर्वण करण्याचि शक्ती.
९. कुहु नाडी- स्थान लिंगदेश चलन वलण मुत्रोत्सर्ग परिणाम रतिभोग.
१०. शंखिनी नाडी- स्थान गुद- कार्य मलोत्सर्ग परिणाम शरीर शुद्धी.
या दहाही नाड्यामध्ये पहिल्या इडा,पिंगला आणि सुषुम्ना ह्या तीन नाड्या प्राण मार्गाच्या आश्रय करून राहतात. प्राण या नाड्यांतून पसरत-पसरत सूक्ष्म सुक्ष्मांतर नाड्यांतून प्रवेश करतो. त्यांची ज्ञान शक्ती व कार्यक्षमता वाढवितो. मेंदूतून मज्जातंतूमुळे प्रक्रिया होवून इंद्रियान द्वारे आपणास वस्तू ज्ञान होते. त्याच्या मागे मन, प्राण व चैतन्ययुक्त चित्त असते. शरीररूपी यंत्राचीधारणा प्राणावर अबलंबून आहे. शरीरात प्राण हा सर्वात मोठा व महत्वाचा घटक आहे. प्राण स्वर आणि श्वास हे तिन्ही शब्द समानार्थिच आहे. स्वर म्हणजे श्वास हा सर्व प्राणीमात्रांचे जीवन आहे.