Chānakya was an Indian teacher, philosopher, and royal advisor. Originally a professor of economics and political science at the ancient Takshashila University, Chanakya managed the first Maurya emperor Chandragupta’s rise to power at a young age. tips given by chankya on life are very useful. he was great mentor of life. Chanakya, also known as Kautilya or Vishnugupta, was born in Pataliputra, Magadh (modern Bihar), and later moved to Taxila, in Gandhar. Hare are some tips given by chankya on life. Read Marathi article “Shtrestatwacha man”.
श्रेष्ठत्वाचा मान – चाणक्य उवाच
आयुष्य जगताना अनेक गोष्टी संपर्कात येतात त्यापैकी कोणाला प्राधन्य द्यावे हे आर्य चाणक्य सांगतात,”समोर असणारी प्रत्येक गोष्ट,प्रत्येक व्यक्ती काहीना काही कारणाने संपर्कात असते पण त्यातून श्रेष्ठ कोण? त्यांना आपल्या आयुष्यात किती महत्वाचे स्थान असावे याचा विचार करता अन्न आणि पाणी हे जीवन जगण्यासाठी अतिशय महत्वाचे असे दोन घटक आहेत.झ्य़ाआ अन्नाच्या सेवनाने आपल्या शरीराची वृद्धी होवून आपण जगत असतो, त्या अन्नाचे व पाण्याचे गरजवंताला दान करावे, अन्न देणाऱ्यांला ‘प्राणदाता’ मानले जाते. सर्व दानांत हे दान श्रेष्ठ मानले जाते. तसेच मंत्र अनेक आहेतं, पण त्यात गायत्री मंत्र बुद्धीदायक असल्यामुळे तो श्रेष्ठ मानला आहें त्याचा जप करावा. तिथीं मध्ये द्वादशी तिथीं श्रेष्ठ, तर विश्वात आई सारखी दुसरी देवता नाही. कारण या जगात येण्याचे भाग्य आईमुळेच लाभले असतें तिने निरपेक्षपणे केलेले पालन-पोषण हेचं सर्वश्रेष्ठ कर्म होय. तेव्हा यासर्व गोष्टींना श्रेष्ठत्वाचा मान द्यायलाच ह्वां.
शरीराचे महत्व – चाणक्य उवाच
परमेश्वराने मानवाला सुंदर शरीराची देणगी दिली आहे. मग तें शरीर व्यवस्थितपणे सांभाळणे,त्याची निगा राखणे हें महत्वाचे आहे. कारण हेळसांड केल्याने शरीर नष्ट झाले तर ते पुन्हा परत मिळत नाही. गेलेले धन कष्ट करून परत मिळविता येते, मित्र जर काही कारणाने दूर झाला त्यालां समजावून जवळीक साधतां येते. तसेच राज्य किंवा देश दुसर्याच्या ताब्यात गेलातर युद्ध करून स्वातंत्र्य परत मिळविता येते, गैर समजातून पत्नी दूर झाली तरी तिची समजूत काढून तिला परत आणता येते पण शरीर हि अशी गोष्ट आहे जी नष्ट झाली तर परत आणण्यासाठी त्यावर काहीच उपाय नाही.