भक्तींचे अभिप्रेत(कीर्तन भक्ती)
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Prayer is such a powerful force. We underestimate it so much. Prayer can move mountains if only we would let it. The combination of fasting and praying is not a fad or a novelty approach to spiritual discipline. “Seven days without prayer, makes one weak.” . Believe in the divine power working within you. Pray that the Holy Spirit may reveal it to you. prayer intensifies you. it creates super natural power inside you. This article Tells you about the Power of Prayer.

power of prayerभक्तींचे दोन अभिप्रेत आहेत.  श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात ‘विभक्त नव्हे तो भक्त’ हि व्याख्या ज्ञांनोत्तर भक्ती सुचविते, प्रेम लक्षणा आणि ज्ञान लक्षणा असे भक्तीचे दोन प्रकार आहे. भाव, प्रेम, चित्ताचे द्रवीभवन, सगुणाचे गुणगान, अष्टसात्विक भाव हे प्रेम लक्षणा भक्तीचे आधार आहे. ईश्वराचे सार्वभौमत्व सर्व कारण तत्व सगुणांचे आळंबन व स्थिरचित्त हे ज्ञानभक्तीचे आधार आहेत. भक्ती हे परिपूर्ण शास्त्र आहे. इतर शास्त्रा प्रमाणेच नारदांनी व शांडिल्य यांनी भक्तीला शास्त्राचा दर्जा दिला आहे. तसे प्रापंचिकाला भक्ती करणे कठीण आहे. ज्ञानयोगाच्या बाबतीत संत ज्ञानेश्वर म्हणतात- ‘अव्दैत कुसरी विरुळा जाने’ ज्ञानयोगी जेवढा विरळ आहें तेवढाच खरा भक्त योगी विरळाच आहें पण जो मनापासून पांढूरंगाच्या पंथ क्रमी लागतो व आपली भक्तीची बैठक दृढ करतो. असा भक्त भगवंताशी अनुसंधान साधून असतो. म्हणून त सतत कीर्तनी मग्न असतो.  तो भक्तीच्या दुसर्या प्रकारानेच म्हणजेच सर्व इंद्रिये आत्म स्वरूपात तद्रूप करतो.  भक्ताची इंद्रिये भगवंताशी एकरूप झाली कि भक्त हा राजा आहें कि रंक आहें किंवा लहान आहे कि मोठा आहे असा भेद किंवा कल्पनाही तो करीत नाही. नवविद्या भक्तीपैकी कीर्तन भक्तींचे महात्म ज्ञानदेवांच्या ओव्यांमधून पहावयास मिळतात. कीर्तनाचा आनंद मिळवावयाचा असेल तर वृत्ती हरी कीर्तनी लावावी लागेल. ईशकामना भक्ताला निष्काम करते. भक्ताच्या वासनेचा क्षय करते आणि वासनेचा क्षय झाला कि तृप्ती होते, या ईशकामनेने भक्ताला समाधान लाभते. तो निष्काम होतो .

तुका म्हणे–   | सदा नाम घोषे करू हरी कथा | तेणे सदाचीया सामाधान ||

एक काम जिंकला कि त्यापासून उत्पन्न होणारे क्रोधादि अनर्थ टळतात. किर्तनाची गोडी लागते व आत्मारामाच्या स्वरूपात भक्त रमून ईश्वर प्रसादाने त्याला शांती लाभते. किर्तनयोगाची ओढ म्हणजे भाषाशुद्धी होणे. परसदार,परनिंदा आणि परधन यांची आशा सुटणे,सत्याची आशा धरणे आणि सत्य आचरणात आणणे प्राणी मात्रांवर द्या करणे, क्षमा गुण अंगी बाळगणे,शांत वृत्ती ठेवणे, दानधर्म करणे, वैराग्य अंगी आणणे हि पथ्य पाळून प्रभू नाम,भजन,कीर्तन करीत जीवन कंठले तरच परमसुख प्राप्त होते. भक्त स्वत:ला विसरतो व चालती बोलती समाधीच तो एक प्रकारे अनुभवतो. तुका म्हणतो — ‘समाधी सुख सांडा ओवाळूनी ‘ असा हा कीर्तनाचा ब्रम्ह रस आहे, हा छंद ज्याला लागला त्याचे चित्त सात्विक होते. त्याचे सोबतीने सर्वांचे परमार्थिक हित होते. वातावरण शांत, पवित्र, प्रसन्न होते. त्याच्या संगतीने सर्वांची प्रवृत्ती सदाचाराकडे वळण घेते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu