Internal Peace is very important. Every one needs Internal Peace. Inner peace (or peace of mind) refers to a state of being mentally and spiritually at peace, with enough knowledge and understanding to keep oneself strong in inside. Finding inner peace comes from allowing every experience to be exactly as it is without any judgement. Inner peace and happiness is a subject that concerns everyone. find “Inner Peace” is good for refreshment during the day as well as before bed. Hardly anyone does this kind of relaxation music better than Halpern. getting Inner Peace is not so simple. and ways of getting it different. here are few tips about your inner peace.
वस्तुत: प्रत्येकाला आत्मशांतीच हवी असते आणि आत्मशांतीचे प्रत्येकाचे साधन निरनिराळे असले तरी सर्वांचे अंतिम ध्येय आत्मशांती हेच असते पण व्यवहारात कार्याकार्याचा निर्णय करण्याकरीता केवळ आत्मशांती हे अंतिम ध्येय अपुरे पडते. कोणतेही कर्म करताना त्याच्या मुळाशी कर्त्याचा काही तरी हेतू असतोच जाणता मनुष्य हेतूरहित कर्म करू शकत नाही, जो हेतू मनात घरून एखादे कर्म केले जाते त्याला त्या कर्माचे साध्य असे म्हणतात. आणि कर्म हे त्या साध्याचे साधन असते.
उदा. सांगाचे झाले तर युद्ध करणे या कर्माचे राज्य मिळविणे हे एक साध्य असते आणि राज्य मिळविणे या साध्याचे युद्ध करणे हे एक साधन असते. या प्रमाणे कर्त्याचा हेतू व त्याने केलेले किंवा करावयाचे कर्म याचा संबंध साध्य-साधन या स्वरूपाचा असतो. साध्य दोन प्रकारचे असते. एक जवळचे किंवा तात्कालिक व दुसरे दूरचे किंवा अंतिम युद्धाचे तात्कालिक साध्य रणांगणावर असलेल्या शत्रू सैन्याचा नि:पात करणे हे असते. आणि दूरचे साध्य राज्य मिळविणे किंवा स्वत:ला सुख प्राप्त करून घेणे हे असते.
कर्माची किंमत कर्त्याच्या हेतू नुसार किंवा साध्यानुसार ठरत असल्यामुळे कोणत्या साध्यानुसार किंमत ठरविली पाहिजे हा नीतीशास्त्रात फार महत्वाचा प्रश्न असतो. पूर्वी स्वर्ग किंवा मोक्ष हि मनुष्याची अंतिम ध्येये समजली जात असत. वस्तूत: ती कोणाचीही अंतिम ध्येये असू शकत नाही. स्वर्गात अनेक प्रकारची सुखे मिळतात अशी ज्यांची कल्पना असते त्यांना त्या सुखाचे साधन म्हणून स्वर्ग हवासा वाटत असतो. तसेच मोक्ष मिळण्यास दुखांपासून व पुनर्जन्मापासून सुटका होवून शाश्वत सुख किंवा शांती मिळते असे ज्यांना वाटते, त्यांना त्या सुखाचे साधन म्हणूनच मोक्ष हवासा वाटत असतो. वस्तुत: सर्वांना आत्मशांतीच हवी असते. इतरांच्या सुख -दुखांकडे किंवा हितांकडे दृष्टी न देता केवळ आत्मशांती हेच ध्येय ठेवून कर्तव्य ठरवू लागल्यास समाजात राहणाऱ्या मनुष्याला शाश्वत आत्मशान्तिचा लाभ होवू शकत नाही. (आचार्य बिनोबा भावे)
दृष्टीकोनात बदल व्हावा.
सारे जग जड पदार्थांनी झालेले आहे. त्यात चांगले -वाईट असे काही नाही. जड पदार्थाचे आपले केवळ स्वरूप असते. त्यात येणारे सुख:दुखात्मक अनुभव तर मनुष्याने स्वत:च आरोपित-प्रक्षेपित केलेले असतात. जड पदार्थ पाप-पुण्य कसे करणार?
त्यांचा दुरुपयोग किंवा सदुपयोगच पाप-पुण्य निर्माण करीत असतो. उदा. इंजिन कितीही समर्थ असले तरी त्यास चालवण्याची क्षमता मनुष्यातच असते. रेल्वे गाडी आपल्या इच्छेने निर्धारित ध्येयापर्यंत पोहचत नसते. तसे केले तर अपघातास निमंत्रण दिल्यासारखेच होईल. सारे जग जड पदार्थांनी बनलेले असल्याने स्वत:हून ते काहीच करू शकत नाही. सचेतन सत्तेचे प्रतिनिधित्व करणारा मनुष्यच आहे. व तो प्रत्येक परिस्थितीस पूर्ण जवाबदार आहे. हे तथ्य समजणे अत्यावश्यक आहे. आणि आम्हास जे चांगले-वाईट भविष्य निर्माण करणे असेल त्यानुसार जनमानस घडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शरीर निर्वाहाच्या पद्धतीत सत्ययुग आणि कलियुग यात कोणताच फरक नसतो तथापि जे जमीन-अस्मानाचे अंतर आढळते त्याचा सृजनकर्ता मनुष्यच आहे. तो केवळ आपल्याच भाग्याचा निर्माता नाही, तर त्याच्याच सामुहिक चिंतन, कृती व व्यवहारामुळे बाहेर तसाच प्रवाह निर्माण होत असतो. त्याच्या इच्छा, संकल्प, आशा-आकांक्षाच्या अनुरूप बाहेरची परिस्थिती घडत जाते. कोमेजलेली वा पिकलेली पाने शिंपडण्याएवजी आम्ही झाडांच्या मुळाना पाणी घालण्याचा प्रयत्न करावा. उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीसाठी काय प्रयत्न करावयास पाहिजे, असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचे मुलभूत उत्तर अपेक्षित असेल तर ते एक आहे ‘दृष्टीकोनात परिवर्तन’ आपल्या मनाची समजूत करण्यासाठी असा विचार करता येईल की, प्रयत्न कोणते करायचे ? त्यासाठी साधन सामग्री कशी मिळवायची? या प्रश्नांची उत्तरे सांगता येतील आणि त्यानुसार प्रयत्न सुद्धा होवू शकतील. योजना तयार करणारे त्या खटाटोपात मग्न होतीलही. तथापि हा मनोरंजनपर चौपटीचा खेळ ठरेल त्यातील प्यादी ईकडच्या तिकडे उचलून पट्कता येतील. तथापि हार-जीत मात्र खेळणाऱ्याच्या मानसिकतेवर अवलंबून राहील.