Common sense is a basic ability to perceive, understand, and judge things which is shared by nearly all people, and can be reasonably expected of nearly all people without any need for debate. Common sense is a crucial factor f our day to day life. in business, in social life even in home we need Common sense. read about importance of Common sense in our life.
आजच्या या काळातील जनमानसातील भावना म्हणजे आपल्या बद्दल लोक काय विचार करीत असतील? काय म्हणत असतील? लोकांना काय आवडते , काय आवडत नाही त्यांच्या आवडी नुसार आपण काय केले पाहिजेत? काय करू नयेत? असल्याच असतात. या करीता पूजा-अर्चा, धार्मिक तत्वांचे आचरण करून कर्मकांड केले जातात. तरी बऱ्यांच ठिकाणी आचार-विचारात थोडाफार फरक असतोंच. तरी यात धार्मिक तत्वे कमी महत्वाची राहून बाकी दिखावाच जास्त असतो. काही अंशी संतांनी याला निषेधच केलेला आहें.
तुकोबारायांच्या अभंगातून स्पष्ट होतें – “करावी ते पूजा मनेची उत्तम | लौकीकाचे काय काम असे |” श्रद्धा आणि पूजा हा मनाच्या एकाग्रतेचा, पावित्र्याचा, विश्वासाचा आणि अध्यात्मिक ज्ञांनाचा विषय आहें. लोकांना दिखावा दाखविण्याचा नव्हे. पण बरेच लोक मात्र लोकांना प्रभावित करण्याच्या उद्देशाने हा दिखावा कर्मकांडाच्या विषयांतून करीत असतात.मात्र मनाच्या दृष्टीने धार्मिक त्त्वापेक्षा नाव लौकिक मिळविण्याची शक्यता जास्तच असते. हे अयोग्य होय, वारकरी सांप्रदायात अध्यात्म आणि व्यवहार यांचा सुंदर समन्वय करण्यात आला आहें; वैयक्तित पूजा आणि धार्मिक आचरणाला लौकिकाची आवश्यकता नाही. भक्तियुक्त मनाची अधिक गरज भासते. मानवाचे जगणे हे फक्त व्यक्तिगत नसून सामाजिक आहे; मात्र समाजात लौकिक टिकून राहावा या साठी आर्थिक सुव्यवस्था बिघडवीण्याची आवश्यकता नाही. परमार्थ आणि प्रपंच, आणि समाज यांना एकत्रित आणण्यास शुद्ध, सात्विक आचरणाची गरज आहें, यामुळे लौकिकता अधिक टिकाऊ होत असते. मोठमोठे कर्मकांड करून देव प्रसन्न होत नाही, आणि समाजातील मिळणारा लौकिक हा काही क्षणाचाच असतो, तो टिकाऊ नसतो. पैसा-धन नष्ट झाले कि त्यासोबतच सामाजिक लौकिक नष्ट होतो. कुणालाही या कर्मकांडाची आठवण सुद्धा राहात नाही. कुठल्याही संतांनी कर्मकांड करण्यास सांगितलेले नाही, कारण त्यांनीही केलेले नाही. त्यांनी केली निस्वार्थ भक्ती, समाज जागृती यातूनच नाव लौकिक केले.
संत तुकोबा म्हणतात–“न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार | घ्यावे वनांतर भस्म दंड” प्रपंचाचा गाडा ओढताना लौकिक अर्थाने अनेक गोष्टी करता येतात. प्रपंच आणि परमार्थ हातात हात घालून चालू शकतो; व्यवहार सोडता येत नाही आणि सोडू नये.