Gyan Ganga: Bathing with water only clear the dirt on your body, but with Gyan Ganga we can clean our soul. with Gyan Ganga you will get a way of life, an art of righteous living or an integrated system for the benefit of the body, mind and inner spirit. Gyan Ganga also called as River of Knowledge.
जल स्नानाने अंगावरील मळ जाउन बाह्य शरीराची शुद्धी तर होतेच. पण अंत शुद्धी होत नाही. *ज्ञान गंगेत डुबणे हेच परम् प्राप्तीचे साधन होय. आत्मतीर्था पुढे सर्व तीर्थे तुच्छ आहेत. आत्मतीर्थातल्या ज्ञानगंगे मध्ये जे न्हातात त्यास पुन:जन्म घ्यावा लागत नाही. स्व:स्वरूपी जळात मन बुडून जाणे, स्नानाच्या योगाने जन्म-मरण रुपी मळ निघून जातो. प्रत्येक जीव अनेक योनीतून फिरत फिरत शेवटी या मानव कोटींत फार दिवसांनी येतो . ‘एक एक योनी कोटी कोटी फेरा । तेव्हा लागे वारा मानवाचा ॥ (तुका) यास्तव मानव देह , महायोग महापर्वकाळ आहे. हे जाणून सर्व नर-नारींने नारायण होण्याकरिता या ज्ञानगंगेत अनेकदा स्नान करावे. ज्याने हे अंर्त स्नान केले नाही त्याच्या बाह्य स्नानाचा काय उपयोग ? उदा. दगडाला बाहेरून कितीही धुतले तरीही त्याचा अंर्तभागास काय लाभ होणार? कोरडा तो कोरडाच याच प्रमाणे या अस्थि-मासाच्या पिंडास कितीही सुवासिक तेल, उटणे, साबण लावून घासून पुसून स्व्च्छ केले तरी त्याचा अंर्त भागावर कोणता परिणाम होणार.?