भावना नुसार फलप्राप्ती !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

This world is the face of god. There is sentence in Marathi “Jiasi jaisi wasana taisi purve narayana”. We get what we deserve for. We get what we want from god. All results are the fruits of our work. This article will tell you about your life and what will you get from god. This article tell you about blessing from god. God blessed us for our good work and punish us for our sin.

Do To Get God To Bless

सर्व संसार ईश्वर स्वरूप आहे. जशी ज्याची भावना तसेच फळ प्राप्त होत असते. मनुष्य जेव्हा आजारी असतो तेव्हा तो दुखण्याच्या अनुभव करतो. वेदना होणे आणि वेद्नाचा अनुभव करणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. आजारी असताना जर वेद्नाचा अनुभव करण्या पेक्षा ईश्वरभक्तीचे मनन केले तर आपण त्या वेद्नातून मुक्त होऊ शकतो. कारण त्या वेदना भक्ती स्वरूप धारण करतात. त्या दुखण्याच्या अनुभवा ठकाणी भक्ती जागा घेऊन वेदना नष्ट होतात. एखादा तपस्वी मनुष्य तप करतो, तेव्हा त्याला त्यात परिश्रम, शारीरिक वेदना होत नाही असे नाही, त्याला वेदना होतात परंतु ते परिश्रम व वेदना शोकप्रद नसून शोक नाशक व शांतीप्रद रुप धारण करतात त्या कष्टमय वेद्नात आनंदाचा अनुभव सामावतो. त्याच प्रमाणे रोगात रोग्याने दृढ भवना ठेऊन जर ईश्वरस्मरणात तल्लीन झाल्यास याप्रकारे भावना ठेवली पाहिजे कि हा रोग द्यामयी ईश्वरा कडून मिळालेला पुरस्कार आहे. हीच भावना सदृढ केली. तर त्या रोगातून सुटका होईल. किंवा भक्तिरूप फलप्राप्ती होईल.

रोगात जर परम तपाची भावना सुदृढ होत गेली, तर अवश्य तो रोग परम तपाचे फल देनेवाला होतो. हा आपल्या इहलौकिक कष्टातून सुटका करून या जिवाला स्वर्ग ते ब्रम्ह लोकात पोचवतो. आणि मुक्तीरूप परम शांती प्राप्त करून देनेवाला सिद्ध होतो. त्या भक्तीत आपल्या पूर्वकृत पापांचा क्षय होतो. तसेच रोग-पीडामढील परम तपाची भावना जीवाला समस्त पापांतून मुक्त करते. जो पर्यंत मनुष्य रोगाला कष्टदायक समजतो, व त्याचा द्वेष करतो, तर तो अधिकाधिक कष्टच देत असतो.

परंतु त्याच रोगाला तपाच्या रुपात, व प्रसाद स्वरूपाने बघितल्यास त्याचा द्वेष न करता त्याला कष्ट न मानता  त्याची निंदा न करता प्रसन्न स्वरूपाने ईश्वराचे स्मरण करा, त्या रोगास ‘ परम तप ‘ समजल्या ‘ जाते. उदा-  संत परम हंस हे कर्करोगाने पिडीत असूनही त्यांनी त्या रोगाला प्रसाद स्वरूप मानून “मां भगवती”  भक्ती सुरूच ठेवली होती. त्यांना त्या पासून कधीच कष्ट झाले  नाही.

अत्यंत वेदना पिडीत असल्याने जेव्हा मनुष्याच्या समोर मृत्यूची भीती असते त्यावेळी मृत्यूमध्ये परम तपाची भावना प्रगट केल्याने ती भावनाच मुक्तीचे कारण बनत असते.  मृत्यू समयी तर मोठ मोठ्या विद्वांन व्यक्तींना व सर्वांनाच भय प्रगट होतो. तेव्हा आपल्या सामान्य मनुष्याची तर गोष्टच वेगळीच तरी व्याधी पिडीत व्यक्तींनी मृत्यू समयी मुक्ती करीता त्याच प्रकारची भावना प्रगट करण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. जसे तपश्चर्येला निघालेल्या व्यक्तीला निरोप देण्यास त्यांचे बांधव मित्र वनात पोचवितात व निरोप घेतात. त्याच प्रमाणे मृत्यू समयी अशी भावना प्रगट  केली पाहिजे कि आता माझे बांधव मृत्यू नंतर मला वनात नेवून माझ्यावर अग्नी संस्कार करून माझ्या शरीराला भस्म करतील. हे प्रभू तेच माझे

“परम तप” होय.  या प्रमाणे भावना असावी. तेव्हा मृत्यूचे भय कमी होते.

या प्रकारे मृत्युरूप महान कष्टाला ‘परम तप’ समजणाऱ्या व्यक्तीला मृत्यूचा शोक व भय कधीच नसतो. त्याला मृत्यू मध्येच प्रसन्नता होत असते.  त्याच प्रमाणे वनात तप करण्यास निघालेल्या साधकास आपल्या परिवाराच्या वियोगाचा किंवा शरीर कष्टाचा शोक नसतो. त्याला फक्त आत्म्याच्या पवित्रतेची, शांतीची, परम आनंद याची भावना मनात सुदृढ झालेली असते. यावेळी त्यांनी मृत्युला ‘परम पद’ म्हणून स्वीकारलेले असते.

कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा रोग असला तरी मनुष्याने त्याची निंदा करू नये. त्या उलट मनात प्रभूचिंतन करावे, तो तुम्हाला परम तपा कडे नेण्याचा मार्ग प्रभूनेच निवडलेला असतो. हे आपण कधीच समजू शकत नाही व उलट प्रभूला शिव्या घालत बसतो. मृत्यू नंतर आपल्या अंतेष्ठीत जन लोक सामील होऊन आपल्याला अंतिम संस्काराला पोचवितात. त्याला आपण आपले ‘तप’ समजावे, त्याच मनुष्याची ‘परम लोकांत’ जीत होते व मुक्तीच मार्ग मिळतो. मनुष्याने जीवनात कधी कधी आपल्या  अंतेष्ठीचा अनुभव न घाबरता अवश्य करावा, त्याने तुमची आयु कमी होत नाही. असला गैरसमज मनात ठेवू नये. त्या उलट मनातील मृत्यूचा भय कमी होत असतो.  मृत्युच्या परम तपाची भावना प्रखर होत जाते. व प्रभूची छाया आपल्या जवळ येते. स्वर्गात होणाऱ्या विटंबनाचा लोप होऊन मार्ग मोकळा सुगम व सुलभ होत जातो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा