मराठी चित्रपट अ रेनी डे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

A RAINY DAY : MARATHI FILM BY RAJENDRA TALAK, The film will be made in Marathi starring Mrinal Kulkarni and Subodh Bhave. each this upcoming marathi movie with your familly and read more about it on marathi unlimited.

A Rainy Day Marathi Movie

प्रत्येक सामान्य माणसाला भेडसावणारी समस्या म्हणजे भ्रष्टाचार, महागाई …याच विषयावर  आधारित सुबोध भावे आणि मृणाल कुलकर्णी या कसलेल्या कलाकारांचा अभिनय आणि रेसुल पोकुट्टी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकाराने केलेली संगीत रचना हे या चित्रपटाचे विशेष … या जानेवारी महिन्याच्या अखेरीस आपण हा चित्रपट पाहू शकतो ! राजेंद्र तालक क्रिएशन आणि आयरिस प्रॉडक्शन यांची निर्मिती असलेला ‘ए रेनी डे’लवकरच तुमच्या भेटीला येत आहे. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला असताना त्याला तोंड कसे देता येईल हे सूचविण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेल्या राजेंद्र तालक दिग्दर्शित या चित्रपटाच्या माध्यमातून आशयघन चित्रपटांच्या मालिकेत आणखी एक कलाकृती जोडली जाणार आहे.

या चित्रपटाची कथा आहे अनिकेतची, ज्याला कुठल्याही मार्गाने लवकरात लवकर पैसा कमावून श्रीमंत व्हायचे आहे. त्याला हवंय ते मिळवण्यासाठी लोकांना लाच देणे, त्यांना भेटवस्तू देणे अशा सर्व मार्गांवर तो रूळलाय. तर दुसरीकडे आहे अनिकेतची पत्नी मुग्धा. जी मानवी मूल्य आणि सद्सदविवेकबुध्दीला प्राधान्य देते. आपल्या आईवडिलांनी केलेल्या संस्काराला बगल न देता आपल्या पतीला या गैरमार्गापासून परावृत्त करण्यासाठी ती आपला संसार पणाला लावते. भ्रष्टाचार हा आपल्या घरातून हद्दपार केला तर तो समाज आणि देशातूनही दूर जाईल असा संदेश ए रेनी डे च्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.आपल्या चतुरस्र अभिनयाने सर्वांना भुरळ घालणारा सुबोध भावे आणि आपल्या संवेदनशील भूमिकांमुळे प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस उतरणारी मृणाल कुलकर्णी हे दोघे प्रथमच रूपेरी पडद्यावर एकत्र येणार आहेत. सुबोधचे धीरगंभीर व्यक्तिमत्त्व आणि मृणालची सोशीक स्त्री अशी प्रतिमा या निमित्ताने एकत्र येत आहे. या दोन्ही कलाकारांच्या साथीला अजिंक्य देव, संजय मोने, मनोज जोशी, नेहा पेंडसे, किरण करमरकर आदी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारही चित्रपटात सशक्त भूमिका बजावताना दिसतील.

‘ए रेनी डे’ची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ज्याच्या कामावर ऑस्करने मोहोर उमटवलेली आहे  त्या रेसुल पोकुट्टी या गुणी संगीत रचनाकाराचे चित्रपटाला लाभलेले संगीत आणि संजय जाधव यांचे छायाचित्रदिग्दर्शन.

मसालापटांच्या भाऊगर्दीत सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला हात घालणारा ‘ए रेनी डे’ नक्कीच यशस्वी ठरेल. या चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन राजेंद्र तालक यांचे असून पटकथा आणि संवाद राजेंद्र तालक आणि अभिराम भडकमकर यांनी लिहीले आहेत. संगीत रचना रेसुल पोकुट्टी आणि अमृत प्रितम दत्ता यांची आहे. चित्रपटासाठी गीते रचली आहेत कवी सौमित्र यांनी तर त्याला स्वरसाज चढवला आहे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी. छायादिग्दर्शनाची जबाबदारी संजय जाधव यांनी पार पाडली असून कलादिग्दर्शन अजित दांडेकर यांचे आहे. चित्रपटाचे संकलन विद्याधर पाठारे यांनी केले आहे. सुबोध भावे, मृणाल कुलकर्णी, अजिंक्य देव, संजय मोने, नेहा पेंडसे, हर्ष छाया, सुलभा आर्या, मनोज जोशी या तगड्या कलाकारांच्या अभिनयाने साकारलेला ‘ए रेनी डे’ ३१ जानेवारीला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Gallery –

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu