What is Nadbramha? Nadabrahma is the humming meditation – through humming and hand movements conflicting parts of you start falling in tune, and you bring harmony to your control.
दोन्ही खांदे व बाहू वर उचलावे ते पाठीचे रेषेत आणून कोपरापाशी हात वाकवून मग कानामध्ये दोन्ही अंगठे घट्ट घालावे. डोळे मिटल्यावर अंगठ्या जवळचे तिसर्या नंबरचे मधले बोट यांनी, जोराचा दाब न पडेल या बेताने डोळे दाबून घरावे. अशा प्रकारे हि चतुर्मुखी मुद्रा धारण केल्या वर काना मध्ये उत्पन्न होणार्या आवाजाकडे लक्ष ठेवावे. व त्याच वेळी भूमध्यावरही लक्ष ठेवावे. या अभ्यासांत बोटांनी डोळे जास्त दाबल्यामुळे बुबुळावर कमी-जास्त दाब बसण्याचा संभव असतो. त्यामुळे डोळे दुखू लागतात. तरी अगदी थोडा थोडा दाब द्यावा. डोळें दुखू लागतांच हात सोडावे. व परत पुन्हा ठेवावें. कानामध्ये प्रथम मोठें आवाज उत्पन्न होतील त्याच नादावर अनु समधान ठेवावे, पुढे, पुढे दशविध निरनिराळे दश नाद ऐकू येऊ लागतात. त्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ शेवटचा नाद म्हणजे स्पष्टपणे सोहं, सोहं असा ध्वनी उमटनें हीच शेवटची पायरी होय. यासच अनुहत ध्वनी – नाद ब्रम्ह म्हणतात.