Salvation and heaven: Salvation is being saved or protected from harm or being saved or delivered from some dire situation. In religion, salvation is stated as the saving of the soul from sin and its consequences.
याच देही याच डोळा | भोगिजे मुक्तीचा सोहळा || ( तुका ), मुक्तीचा सोहळा म्हणजे –:
‘मोक्ष’ संतांचा मोक्ष उधारीचा नाही. मोक्ष म्हणजे मेल्यानंतर मिळविण्याची स्थिती किंवा स्थान नव्हे व हे साध्य करण्याकरीता प्रपंच सोडण्याचे किंवा मरणाची वाट बघण्याचे मुळीच कारण नाही. सो$हं जोर्ती ब्रम्हाचे यातार्थ ज्ञान याच देही व आपल्या डोळ्यासमोर प्रकट करणे याच नावं ‘मोक्ष’ होय. सो$हं शब्दाचे सतत स्मरण केल्याने ‘मोक्ष’ प्राप्त . काहीं लोक ‘मोक्ष’ वेगळा आणि ‘स्वर्ग’ वेगळा मानतात. पण हे दोन्ही अध्यात्म दृष्टीने एक रूपच आहेंत. ** स्वर्ग म्हणजे – स्व-स्वरूपाला जाणणे व मोक्ष म्हणजे जन्म-मरणातून वेगळे होणे. स्व-स्वरूपाला जाणल्यानंतर जीव जन्म-मरणाच्या पाशांतून,बंधनातून मोकळा होतो,स्वतंत्र होतो. याचं नाव ‘मोक्ष’ व याचचं नाव ‘स्वर्ग’ हे दोन्ही एकच रूप जाणावे. यालाच मोक्षसुख, स्वर्गसुख, आत्मसुख म्हणतात. सो$हं ज्योर्तीब्रम्ह स्वरूप परमात्मा हा अनंत अपार सुखाचा ‘निधी’ आहे यासुखाचे वर्णन शब्दांनी करता येणे शक्य नाही. * पुरुषार्थ म्हणजे कांय -धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे हे चार पुरुषार्थ आहेंत, त्यांपैकी
‘ सो$हं ‘ भावयुक्त जी भक्ति हा ‘पंचम पुरुषार्थ’ होय.
* योग — शास्त्र!
योग या शब्दाचा अर्थ- जिवाशिवाचें ऐक्य याला पाश्च्यात्य मानस शास्त्री (मिस्टीसिझम) म्हणतात. प्राणवायु हृदयांत राहतो तो अपान वायुला वर ओढीत असतो. * अपान मूलाधारांत (गुद्स्थानी) राहतो तो प्राणाला खाली ओढीत असतो. हे दोन्ही परस्पराशी जणू काय युद्ध करीत आहेत. यांची ऐक्यता सो$हं जपानें च होत असते. सो$हं ध्यान योगाने कुंडलिनी सहज जागृत होतें. मोक्षाचे द्वार खुले होते. * मानवी शरीरामध्ये कुंडलिनी हीच सर्वश्रेष्ठ अशी शक्ती आहे हि अधोंमुखी सर्पाकृती असून साडेतीन वेटाळी घालून नागिनी प्रमाणे सुप्त आहें. कुंडलिनी नाभिस्थानी असून या नाभीस्थानापासून ७२०००(बाहात्तर हजार) नाड्या सुरु होतात. कुंडलिनी ला ‘प्राणशक्ती’ म्हणतात. कुंडलिनी हि विजे प्रमाणे चमकते. * कुंडलिनिला जागृत करण्याकरीता सो$हं मंत्राचा जप दृढात्मक आवश्यक आहे. सो$हं जप ध्यानाने कुंडलिनी सहज जागृत होतें. या योगाने आपण शक्तिमान झालो आहें असे साधकास भासते. आणि जीव -शिव एक झालें असे वाटून त्यांना पूर्ण एकाग्रता निर्माण होते.
** इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा तीन नाड्या आहेंत. डावी नाडी ‘इडा’ होय. उजवी ‘पिंगला’ होय. इडा डाव्या व पिंगला उजव्या नाकपुडीतून वाहते. व सुषुम्ना हि या दोहोच्या मधून वाहते. * हि सुषुम्ना ही ब्रम्हरंर्धाला पोचवण्याची जणुकाय ‘शिडीच’आहे. सो$हं जपाने कुंडलिनी जागृत होऊन पाठींच्या कण्यांतील मध्यपोकळीतून सुषुम्ने मधून ती वर सहस्त्रदल कमलामध्ये पोचते. या योगे साधकास आत्मसिद्धी प्राप्त होऊन परमपद प्राप्त होते.