Prayer fasting importance of fasting: This article will tell you the Importance of Fasting. why its so important for your body and Mind. Keep Mind in peace with Fasting.
खाण्यापिण्याची प्रत्येक वस्तू प्रथम सोहं प्रभूला अनन्य भक्तिभावाने अर्पण सोहं ब्रम्हार्पण केल्याशिवाय कोणीही, कदापि कोठेही चुकून देखील खाउं, पिवुं नयें असा नित्य अभंग नियमच प्रत्येकाने ठेवावा! या दिव्य नियमाचरणाने – विषाचे देखील अमृत होतें ‘सोहं ब्रम्हार्पणाने’ विष देखील अमृत बनते. म्हणून खाद्य- पेयादि सर्वच वस्तू ‘सर्व प्रथम व शेवटीहीं मनात सोहं ब्रम्हार्पण करीत जावे. * तत्वत: सोहं प्रभूचे स्मरण हेंच खरे विष किंवा मरण होयं.
। नाम घे जो ग्रासोग्रासी । तो जेवला तरी उपवासी ॥ ( तुकाराम )
उपवास म्हणजे ‘निराहार’ नव्हे तर ‘उप, म्हणजे ‘जवळ’ व ‘वास’ म्हणजे ‘निवास’ * ईश्वरा जवळ अखंड निवास असा ‘उपवास’ शब्दाचा खरा भावार्थ आहें. * असेच अखंड सोहं नामस्मरणाचे अखंड वळण वाचेला व इंद्रीयांना लागले पाहिजे.
। पडिले वळण इंद्रिया सकळा । भाव तो निराळा नाहीं दुजा । (तुकाराम )
*प्रेम काय ?
प्रेम हें परमेश्वराचे प्रत्यक्ष रूप आहें ! [ लव्ह इन गॉड ]
प्रत्येक जीव खऱ्या शुद्ध प्रेमाची अपेक्षा हृदयापासून करतो. * खोटे अशुद्ध प्रेम -मायावी, कपटी, मोहमय असें मोहांध प्रेम आंधळे असतें-फसवे असतें व अतिशय घातक असतें * वस्तुत: शुद्ध खरे प्रेम प्राप्त करणारे असतें * ईश्वर खऱ्या शुद्ध प्रेमाचाच भुकेला आहें. खऱ्या शुद्ध प्रेमाशिवाय ईश्वर दर्शन नाहीं. खऱ्या प्रेमाशिवाय जप, तप, योग, यज्ञ, धर्म, कर्म, भक्ती, ज्ञान आणि ध्यान वैगरे सर्व व्यर्थ व दंभपूर्ण आहेंत. * प्रेम हे सर्वांचे प्राण तत्व आहें. * प्रेम हें अजिंक्य आहें. * प्रेम सर्वांनाच जिंकू शकते. * साक्षात परमेश्वर सुद्धा प्रेमाणेच जिंकला जातो. वश होतो. । प्रेमसूत्र दोरी । नेई तिकडे जातो हरी ।। (तुकाराम )
खरे प्रेम हेंच प्रत्येकांच्या जीवनातील आणि ईश्वर भक्तीतील ‘प्राण तत्व ‘ व ‘जीवन तत्व’ व ‘आत्म तत्व’ आहें.
* प्रयत्न— !
‘प्रयत्ना अंती परमेश्वर’ प्राप्ती निश्चितच आहें. ज्या प्रमाणे उसात साखर असतें पण तिला मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढावी लागतें. चंदनात सुवास असतो, पण चंदनास घासल्याशिवाय तो व्यक्त होत नाहीं. दुधांत धृत असते पण त्याला तापवून, विरजवून, घुसळून, कढवून व्यक्त केले जातें. तसेच तिळांत तेल असते पण त्याला घाण्यातघालून रगडल्याशिवाय ते हातीं लागत नाही. तद्वत- ज्योतीस्वरूप सो$हं परमात्मा प्रत्येकाच्या देहांत आहें पण त्याचा साक्षात्कार आळस सोडून दीर्घकाळ सतत सो$हं ध्यानाभ्यास केल्यावाचून होणार नाहीं. सो$हं घ्यानाभ्यासात आत्मज्योर्तिमय दिव्य प्रकाशात नील बिंदू दिसू लागतो. तो दिसणे म्हणजे हेंच ब्रम्हदर्शनाचे पूर्व शुभ चिन्ह होय. कारण तो निलबिंदू हेंच निजस्थान-निजधाम आहें . त्याच्या ठायी चित्त स्थिर करावे. रीतीने दृष्ठी स्थिर झाली म्हणजे तो साधक अंर्तलक्षी होतो. अंर्तलक्ष असलेंल्या स्त्री-पुरुषांचे बर्हीलक्ष हे निरर्थक आहें. सो$हं ज्योर्तीब्रम्हाचा साक्षात्कार झालां असता-हृदयातील चिद्चिद ग्रंथी तुटते व सर्व संशय नाहीसे होतात.