नेल्सन मंडेला यांचा जन्म – १८ जुलै १९१८ मध्ये म्वेझो (साउथ आफ्रिका).
नेल्सन मंडेला यांचा मृत्यू – ५ डिसेंबर २०१३ जोहानार्स्बार्ग, साउथ आफ्रिकादक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांचे गुरवारी मध्यरात्री निधन झाले. ते ९५ वर्षाचे होते. नेल्सन मंडेला यांचे त्यांच्या राहत्या घरीच निधन झाले. या घटनेची बातमी राष्ट्रपती जैकब जुमा यांनी एक पत्रकार परिषद बोलावून काल रात्री उशिरा दिली गेली.
राष्ट्रपती जैकब जुमा यांनी त्यांच्या निधनाची घोषणा करतानी म्हटले कि “राष्ट्र आज एका महान पुत्राला पोरके झाले आहे”, त्यांनी अजून म्हटले कि नेल्सन मंडेला यांनी आयुष्यभर आपल्याला एक करण्याचा पर्यंत केला म्हणून आपण त्यांची शेवटची यात्रा एक होऊनच पूर्ण करणार. असे म्हणून त्यांनी नेल्सन मंडेला यांना आदरांजली वाहिली.
आयुष्यभर वर्न्द्वेशाविरूढ लढा देणारे नेल्सन मंडेला यांना फुफुसामध्ये संसर्ग झाल्याने त्यांना काही महिन्यापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आणि त्यांच्यावर आता त्यांच्या घरीच उपचार सुरु होते.
दक्षिण आफ्रिकेतील रंगभेद विरोधी मोहिमेचे ते प्रणेते होते. त्यांना २७ वर्षाचे असतानाच पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. पण त्या नंतर ते दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती झालेत.
नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेत देव सारखे पुजल्या जात असते.नेल्सन मंडेला यांचा जीवन प्रवास –
वर्नाद्वेशाविरूढ लढणारे नेल्सन मंडेला, त्यांनी या लढाईला खर्या अर्थानी बाल दिले, हेच आपल्या आयुष्याचे ध्येय आहे असे मानणारे नेल्सन मंडेला हे आफ्रिकेचे नव्हे तर जगासाठी एक आदर्श नेतृत्व होते.
कोणत्याही प्रश्नावर केवर चर्चेच्या माध्यमातून योग्य तो तोडगा निघू शकतो असे त्यांचे ठाम मत होते.
त्यांचे मूळ नाव रोलिल्हाल्हा हे होते.
शाळेत शिकणारे त्यांच्या कुटुंबातील ते पहिलेच व्यक्ती होते.
नेल्सन मंडेला यांना दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधी म्हणून ओळखले जाते.
नेल्सन मंडेला यांनी क्लार्क बेरी शाळेत आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी हेल्दटाऊन येथून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आहेत.
१९४० पर्यंत नेल्सन आणि त्यांचा मित्र ऑंलिवर टम्बो त्यांच्या राजनैतिक विचारांमुळे आधीपासूनच खूप चर्चेत होते.
१९६३ मध्ये त्यांना तुरुंगाची शिक्षा सुनाविण्यात आली. २७ वर्षाच्या या शिक्षेत त्यांनी चक्क १८ वर्ष रोबन बेटावरील तुरुंगात घालविली आहेत. त्यावेळी त्यांच्या सुटकेसाठी दक्षिण आफ्रिकेवर जगभरातून दबाव वाढत होता. त्यावेळचे तत्कालीन अध्यक्ष पी.डब्लू बोथा हे आजारपणामुळे पायउतार झाल्यानंतर नवीन अध्यक्ष एफ. डी. तार्क यांनी ११ फरवरी १९९० साली मंडेला यांच्या सुटकेचे आदेश दिले.
त्यानंतर १९९४ साली पहिल्या लोकशाही निवडणुका झाल्या व त्यात नेल्सन मंडेला हे विजयी झालेत.व २७ मे १९९४ साली ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष बनले.
त्यानंतर त्यांनी १९९६ साली अल्प्संख्यान्काचे हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हमी देणारी राज्यघटना बनवून घेतली.
Nelson Mandela Dead: Former South African President Dies at 95, Nelson Rolihlahla Mandela was a South African anti-apartheid revolutionary and politician who served as President of South Africa from 1994 to 1999.