हायपरकोलेस्टेरॉल आणि हृदयरोग




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Hypercholesterolemia and heart disease (also spelled  hypercholesterolaemia)is the presence of high levels of cholesterol in the blood. Cardiovascular disease (also called heart disease) is a class of diseases that involve the heart, the blood vessels (arteries, capillaries, and veins) or both.

Hypercholesterolemia and heart diseaseविज्ञानाच्या चमत्काराने मानवाला आश्चर्यचकित केले आहे. चिकित्सा जगातही अनेक अविष्कार झालेले आहे. वेगवेगळे यंत्र, मशीन अनेक औषधी आणि विविध सुविधा प्राप्त झाल्या तरी रोगांचे तांडव कमी झालेले नाही. विविध रोगांनी मानवाला जखडून टाकलेले आहे. हृद्य रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह हे याच संघर्षमय युगाची देणगी आहे. या व्यतिरिक्त हायपरकोलेस्टेरॉल चे रोगी सापडत आहेत, आपल्या आहारातील विषमतेमुळे हे होते. कारण आपल्याला आरामाचे जीवन आवडते, श्रम करणे आपण टाळतो. आणि याचाच परिणाम ‘हायपरकोलेस्टेरॉल’ हृद्यरोग वाढविणाऱ्या या कोलेस्टेरॉल ला नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. याच्या अधिक मात्रेमुळे मस्तिष्क, धमनींना नुकसान पोहोचू शकते. तसेच याचे योग्य प्रमाण शरीरस्वास्थ्य ठेवायला मदत करते. कोलेस्टेरॉल अंतर्भाव लिपीडमध्ये होतो. हे लिपीड पाच प्रकारचे असतात. हे मानवी शरीरातील महत्वपूर्ण घटक आहे. सर्व प्राण्यांच्या शरीरात कोलेस्टेरॉल असते. ते जास्तीतजास्त नाड्यामध्ये असते. याचा स्त्राव पित्तरसामध्ये होतो. व यकृतामधील रक्तवाहिन्यामध्ये सहभागी होतो. चिकीत्सकीय दृष्टीने याला अत्यंत महत्व आहे. शरीरामध्ये निर्मित सर्व प्रकारचे स्टेराईड हार्मोन्स अत्यावश्यक अंग आहे. लिपिडच्या एकत्रिकरण, संवहन, ट्रान्सपोर्ट आणि उत्सर्जन यामुळे विकृती आल्यावर खालील व्याधी होतात. जसे लठ्ठपणा, यकृत प्लीहा वाढणे, एथेरोस्क्लेरोसिस, अन्नाशयामध्ये सूज, पित्ताश्मरी इ. घटक एथेरोस्क्लेरोसिसला महत्वपूर्ण आहे. लिपीडच्या एकत्रीकरणामुळे तो होतो, एथेरोस्क्लेरोसिस अर्थात धमनीमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाल्यामुळे त्या कडक होतात त्यामुळे धमनिचा मार्ग बंद होतो. व शरीराच्या अन्य भागात कमी पोचते. हृदयातील धमनीमध्ये अडथळे झाल्यावर छातीत दुखणे व कधी कधी हृद्यविकाराचा झटका येतो. हा अडथळा नाड्यातून होतो. मस्तिष्कात झाल्यावर स्मरणशक्तीचा नाश, मस्तिष्काच्या कामात विकृती, लखवा, वृद्धाव्स्थेतील व्यवहार, स्वभावादी मध्ये फार फरक पडतो. या व्यतिरिक्त शरीरातील अन्य भागातील धमनी मध्ये हा कोलेस्टेरॉल जमा होऊन ग्यग्रिनही उत्पन्न होऊ शकतो. या कोलेस्टेरॉल मुळे लेरिकसिंड्रोन नावाची व्याधी पण होते. ज्यात प्रामुख्याने पोट आणि पायाच्या धमनी मध्ये अडथळा होतो. उच्च रक्तदाब व मधुमेहाच्या रोग्यामध्ये कोलेस्टेरॉल ची मात्रा वाढणे व रक्तवाहिन्यात जमा होण्याची शक्यता जास्त असते. तेव्हा उच्चरक्तदाब व मधुमेहाच्या रोग्यांनी कोलेस्टेरॉलविरहीत आहार घेणे आवश्यक आहे. यात सलाद, हिरव्या भाज्या, फळ,ताक इ. सामावेश करावा. आहारविहाराच्या नियंत्रणा मुळे कोलेस्टेरॉल ची मात्रा सामान्य करणे महत्वपूर्ण आहे. तेल, तुप, मांसाहार दारू, बटाटे इ. चरबी युक्त आहार फार कमी करावा. तसेच विहारात मानसिक तणावापासून मुक्त राहावे. कायम स्वरूपी लठ्ठपणा पासून बचाव करावा. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आयुर्वेदसंहितेत मेदोहर औषधीचे वर्णन आहे. यात प्रामुख्याने त्रिकुट, त्रिफळा, कुटकी, लसून, पुनर्नवा, विडंग इ, उपचाराकरीता उपयोगी आहेत. या व्यतिरिक्त आरोग्यवर्धिनी, व त्रिफळा चूर्ण दोन चम्मच सकाळ, सायंकाळी घ्यावे. या सोबतच लठ्ठपणा घालविण्या करीता मदोहर गुग्गुळ सकाळ, सायंकाळ एक चम्मच घ्यावे. यात डोके दुखी किंवा अन्य व्याधी झाल्यास डॉ. सल्ल्यानुसार औषधी घ्यावे.

हायपरकोलेस्टेरॉलमुळे हृदया जवळील धमनी प्रभावित होतात. ज्यामुळे सारखे छातीत दुखणे सुरु होते. आधुनिक चिकित्सेनुसार यात एन्जीयोप्लास्टी करून धमनीमधील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी औषधी आहेतं त्यामुळे एन्जीयो प्लास्टी टळू शकते. तेव्हा योग्य चिकीत्सकाच्या मार्गदर्शनातून मेदोहर व हृद्य औषधी घेऊन एन्जीयोप्लास्टी टाळता येतो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu