सकारात्मकता एक उर्जा !
Like
Like Love Haha Wow Sad Angry

How to Radiate Positive Energy: If you concentrate on what you don’t have, you will never, ever have enough” … Fuel yourself with positivity and let that fuel propel you into positive action.

positiveness inside you

सकारात्मकता एक उर्जा !

 परमेश्वराने मानवाची रचना करताना प्रत्येक अवयवाला त्याचे काम ठरवून दिलेले आहे. मात्र नकारात्मकता आणि ताण तणाव यामुळे या अवयवांची सुसंगती बिघडते, यात मन सुद्धा सामील आहें मनाचा, बुद्धीचा म्हणजे विचारांचा आणि अवयवांचा ऎकमेकांची अनोन्य संबंध असतो. सगळे एकमेकांवर अवलंबून असतात. ज्यावेळेस आपण ताणतणाव रहित आयुष्य जगत असतो त्यावेळेस मन, शरीर, आणि अवयव योग्य तर्हेने आपापली कामे करीत असतात. छोट्याशा अपघाताने सुद्धा शरीरात झालेला बिघाड दुरुस्त करण्यासाठी शरीर समक्ष असतं. पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मनात नकारात्मकता खेचून घेता त्यावेळेस शरीर स्वत:ची काळजी घ्यायला अपुरे पडते. कारण बिघडलेली मानसिकता त्याला साथ देऊ शकत नाही. पण स्कारात्म्क्तेची भावना मन आणि शरीरा साठी उर्जा ठरते.

रोगट पेशींची निर्मिती होते !

सतत सकारात्मक भावना असलेल्या शरीरात रोग जास्त काल वास्तव्य करू शकत नाही. कारण आपल्या शरीरातील लाखो पेशी रोज नष्ट होत असतात. जे तुमचे विचार हे सकारात्मक असतील तर तयार होणाऱ्या पेशी या सुधृढ असतात ज्या रोगाला प्रतिकार करून शरीरात आरोग्य राखण्याचा प्रयत्न करतात. पण जर तुमचे विचार सतत नकारात्मक असतील किंवा जो आजार तुम्हाला असेल त्यावर तुमचे लक्ष सतत केंद्रित होत असेल,तुमच्या आजारा विषयी तुम्ही सतत त्यच विषयावर बोलत असाल तर्ह नकारात्मकता वाढत असते आणि मग सुधृढ पेशी निर्माण होण्यापेक्षां रोगट पेशींची निर्मिती जास्त होत असते. याचाच परिणाम म्हणजे तुम्हाला शरीराकडून सकारात्मक साथ मळत नाही, व आजार बरा होण्यापेक्षा तो बळावत जाण्याची शक्यता जास्त असते.

रोग्या जवळ बसताना विषयात सकारात्मकता असावी !

अनेक वेळा आजाऱ्याला भेटायला येणाऱ्या व्यक्ती त्या रोग्याशी आवर्जून ‘त्यांच दुखणं’ याच विषयावर प्रकर्षाने बोलतात. कधी कधी तर हा रोग किती घातक आहे,जीव घेणा आहें याचे वर्णन करून स्वत: कुठेतरी पाहिलेल्या घटनेबाबत अगदी विस्तार पणे सांगतात. पण यामुळे आधीच दुखण्याने आजारी झालेला व्यक्ती ते वर्णन ऐकून भीतीने अजून घाबरतो व चिंतीत होऊन त्याचे आजारपण अधिकच बळावते. तेव्हा पेशंट जवळ असणार्या किंवा भेटायला येणाऱ्या परिस्थितीचे भान राखून विषय चर्चेत सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करावा. त्याला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करावा। आणि पेशंटनेही अश्या विषयांना बगल देऊन सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा.

चांगल्या विचारांची सकारात्मकता !

सकारात्मक विचारांमुळे मनातील वाईट विचारांचे अस्तित्वच संपते शिल्लक राहतात ते फक्त चांगले विचार आपल्या हातून चांगले कर्म कसे घडेल असाच विचार सतत करतात त्यातून समाजाच्या हिताची बरीच कार्य हातून घडतात तुमच्या कृती मुळे अनेकांचं कल्याण होतं अनेकांना तुमच्या बद्दल विश्वास निर्माण होतो. दुसऱ्याच्या विश्वासाला प्राप्त ठरण हि मानवी जीवनातील यशस्विता आहें जेव्हा तुम्ही दुसऱ्या कुणाचाहि विश्वास मिळविता त्या वेळी साहजिकच तुमच मनं प्रसंन  होते. तुमच जीवन तुम्ही स्वत: एका उच्च स्तरावर नेत असतां तुमचा मानसिक ईतका उंचावतो कि तुमचे व्यक्तिमत्व उच्च पातळीवर गेलेले असते हे तुमच्या लक्षातही येत नाही त्यावेळी तुम्ही करोडो लोकांचे चाहते बनलेले असतां.

सकारात्मकता – म्हणजेच स्वीकार करा ……

आपल्या लक्षात येत आहे की वैश्विक शक्तींच बळ खूप मोठ आहे. आणि ती शक्ती सर्वार्थाने तुमच्या पाठीशी उभी आहें. जर काही कारणाने तुम्हाला नको वाटणाऱ्या घटना, किंवा गोष्टी अचानक तुमच्या आयुष्यात आल्या, त्यांचा त्रास वाटायला लागला तर अस्वस्थ होवून गोंधळून जावू नका, तुम्ही गोंधळलात तर अधिक नकारात्मक व्हाल त्यापेक्षा त्या नकोशा गोष्टींना प्रथम शांतपणे स्वीकारा आणि मग त्यांच्याबद्दलचे नकारात्मक विचार डावलून त्या जागी सकारात्मक विचारांची स्थापना करा, म्हणजे त्रासदायक विचार कोणत्याही त्रासा शिवाय विरघळून जातील आणि तेथे सकारात्मकतेचे अस्तित्व राहील परंतु त्रासदायक गोष्टी जर मनाने स्वीकारल्या नाहीत तर त्यांना मनाबाहेर काढणार कसे? त्या बाहेरच्या बाहेरच राहून अधिक भीतीदायक बनतात, आणि एकदा का त्याचा स्वीकार केला की त्यावर काही ना काही तोडगा काढून त्या हळू हळू बाहेर पडतात. किंवा कधी कधी त्या आपल्याला फायदेशीर ठरतात.

मनाच्या विचारांकडे आपली उर्जा प्रभावित होत असते.…।

प्रत्येकाला आयुष्यात ताणतणाव हा असतोच आणि कित्येकंदा फार गंभीर प्रसंगातून जावं लागतं, त्यामुळे आलेल्या आपत्तीचा मनाला इतका धक्का बसतो की ते संकट टळले तरी ती व्यक्ती सतत धास्तावलेली असते की असे संकट पुन्हा येणार तर नाही याने. परंतु एकदा येणाऱ्या संकटाची पुन्हा पुनरावृत्ती प्रत्येक वेळी होते असे नाही. पण मनावर त्याची सावली मात्र सतत पडलेली असते. परंतु ही अवस्था बदलण फार आवश्यक आहे त्यासाठी मनातील भीती काढून मन:स्थिती स्थिर करणं फार गरजेच आहे. मनात येणाऱ्या या गोष्टीना बाजूला करणे आवश्यक होते. पण ते लिहिण्या, बोलण्या इतकं सोप नाही हे जरि खरे असले तरी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपल्याला जी गोष्ट हवी ती सुखाची आहे, त्याच गोष्टीं कडे लक्ष

वळविण्याचा सराव करावा किंवा मंत्रोच्च्याराचा आधार घ्यावा. कारण यातील एक महत्वाचे तत्वं म्हणजे आपले लक्ष, आपले विचार, आपले मन जिथ जातं तिकडेच आपली उर्जा आणि शक्ती प्रभावित होत असते.

नकारात्मक भावनांना उर्जा पुरवू नका….

एखादी व्यक्ती किंवा कुणाचे वागणे आपल्याला अजिबात आवडत नसेल ते तुम्हाला त्रासदायक ठरत असतील त्यांपासून आपल्याला फार मनस्ताप झालेला असतो. म्हणून त्याबद्दल तुमच्या भावना ह्या अतिशय तीव्र असतात, तुम्ही त्याला मनापासून सतत प्रतिरोध करीत असता, कि हि गोष्ट मला अजिबात नको आहें, त्याचा मला नको मनस्ताप होतो. तर एखाद्या त्रासाबद्दल अशी वारंवार प्रक्रिया येणं साहजिकच आहें, पण त्यामुळे होते काय की, हा नकारात्मक भाव ईतका प्रबळ होत जातो. ‘हा त्रास नको’ म्हणता म्हणता तुम्ही त्या भावनेला सतत उर्जा असता, त्यामुळे ती भावना अधिक शक्तीशाली होवून तुमच्या जवळ सारखी येत असते आणि तुमचा त्रास अधिकाधिक वाढतो, यासाठी उपाय काय? फक्त प्रतिरोध न करणे !

 सुविचार —

मानवी शरीराजवळ अशी एक क्षमता आहे की, अन्य कोणत्याही यंत्राजवळ नाही, मानवी शरीर अनेक वेळा स्वत:ची दुरुस्ती स्वत:च करू शकतो .

( जॉर्ज क्रेन )

सर्व शिक्षणाचे ध्येय म्हणजे माणूस निर्माण करणे हेच होय.  ….  (स्वामी विवेकानंद )

पर्यावरण आणि तंत्रज्ञान हे दोन्ही हातात हात घालून चालू लागले तर देशाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही.   ……. ( राजीव गांधी )

शिक्षक हे जीवनरूपी बागेचे माळी आहेत आपल्या ज्ञानामृताने ते हि बाग फुलवितात, याच प्रमाणे त्यांची वर्तणूक असायला हवी. ( महर्षी अरविंद )_

 तुम्हाला पुढे जाववत नसेल तर जावू नका परंतु पुढे जाणाऱ्यास मागे खेचू नका. …………… ( लोकमान्य टिळक )

तुमच्या विचारांशी तुम्ही प्रतारणा करू नका  तुम्ही त्यांच्याशी प्रामाणिक राहा आणि त्यांच्या नुसार तुम्ही वर्तन करा. ……।   (रामकृष्ण परमहंस )

अभिलाषा सोडलेला मनुष्य श्रीमंत होतो परंतु लोभ सोडलेला करा सुखी होतो…………………… ( भगवान  श्रीकृष्ण )

राज्यात दुफळी माजली तर राज्य फार काळ टिकत नाही, तसेच घरात कटकटी निर्माण झाल्या तर घराला घरपण राहात नाही…… ( येसू ख्रिस्त )

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu