मराठ्यांचा इतिहास भाग १
Like
Like Love Haha Wow Sad Angry
11

History Maratha Empire part – 1, The term Marāthā has two related usages: within the Marathi-speaking region it describes the dominant Maratha caste; historically, the term describes the kingdomfounded by Shivaji Raje in the seventeenth century.

shivaji maharaj

मराठ्यांचा इतिहास भाग १

शिवाजी राजांचा जन्म १९.०२.१६३० ला शिवनेरी किल्ल्यावर झाला. (जुनी तारीख ६.४.१६२७). महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज्यांचीच निर्मिती आहे. शहाजी महाराजांनी त्यांची पुणे, सुपे येथील जहागिरी, जी नेहमीच स्वतंत्र होती. ती त्यांनी शिवाजी महाराजांना बहाल केली. नंतर त्यांनी मावलं, कोकण आणि देश या भागातील लोकांना स्वराज्याचे स्वप्न ठेऊन, महाराष्ट्राचे ध्येय त्यांच्या समोर ठेऊन महाराजांनी त्यांना संघटीत केली. आणि परकीय सत्ताधार्यांना पराभूत करून त्यांनी स्वराज्य स्थापन केले. या नवीन स्वराज्याला महाराजांनी कार्याश्रम लष्करी आणि सनदी प्रशासन देऊन त्यांनी हे स्वराज्य भक्कम पायावर उभे केले. आर्थिक दृष्ट्याही त्यांनी हे स्वराज्य स्वावलंबी बनविले. सर्वधर्मसमभावाचे तत्व आचरणात आणून त्यांनी असर्व धर्मातील लोकांना त्यात सामावून घेतले. ई.स.१६७४ मध्ये महाराजांचा राज्याभिशेख सोहळा पार पडला. त्यांनी त्याप्रसंगी रजशख सुरु केले, आणि स्वतःची शिवराई आणि होन, हि सोन्याची नाणी सुरु केली. असे नाणे सुरु करणारे ते पहिलेच मराठी छत्रपती आहेत. परंतु त्यांच्या अकाली मृत्यूमुळे वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी (५ एप्रिल १६८०) महाराष्ट्रात एक पोकळी निर्माण झाली. मध्ययुगातील शिवाजी महाराजांचे स्थान सुप्रसिद्ध इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी आपल्या शिवचरित्रात विशद केलेले आहे, ते त्यात म्हणतात कि,” शिवाजी महाराज हे काही फक्त मराठी राष्ट्राचाच निर्माता नव्हता, तर ते मध्ययुगातील एक सर्वश्रेष्ठ रचनाकार, लोकोत्तर पुरुष होते. राज्ये नष्ट होतात, साम्राज्याचे विघटन होते, राज्घारानेही निस्तनाबूत होतात, परंतु “लोकनायक राजा” अशा शिवाजी महाराजांची स्मृती जतन करणे हि आपल्यासाठी एक गौरवाची गोष्ट आहे. शिवाजी महाराज हे आपल्याला लाभलेले एक अक्षय ऐतिहासिक वारसा आहेत.

शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी राजे (ई.स.१६५७-८९) यांची कारकीर्द फक्त ९ वर्षाची आहे. या लहानश्या कारकिर्दीत त्यांना अंतर्गत कलह आणि शिद्दी, पौर्तुगीज, मुघल यासारख्या शत्रूंचा सामना करावा लागला आहे. मुघलांच्या हातून त्यांचा १६८९ साली अमानुष वाढ करण्यात आला. त्यामुळे मराठी लोकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झाली. त्यानंतर शिवाजी महाराजांचे कनिष्ट पुत्र राजाराम महाराज (१६७०-१७००) यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाविरुद्ध स्वातंत्र्य युध्य पुकारले. आपला अफाट असा फौजफाटा घेऊन औरंगजेब बादशाहने त्याच्या मृत्यू पर्यंत (१७०७) मराठी साम्राज्य नेस्तनाबूत करण्याचा अतोनात प्रयत्न केला. परंतु त्याला त्यात यश आले नाही. राजाराम महाराज्यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या पत्नी ताराबाई यांनी स्वतान्त्रायुधाची सूत्रे आपल्या हाती घेतली, आणि नंतर त्यांनी त्यांचे दुसरा पुत्र शिवाजी यांना छत्रपती म्हणून घोषित केले. परंतु औरंगजेबच्या कैदेत असलेला संभाजी राज्यांचा पुत्र शाहू महाराज यांची १७०७ साली सुटका झाली त्यावेळी मराठी साम्राज्यात दोन गात तयार झाले. एक छत्रपती शाहू पक्ष, तर दुसरा ताराबाई पक्ष. आणि नंतर त्यांच्यातच यादवी युद्धाला सुरवात झाली. मग शाहू महाराजांनी साताऱ्यात तर ताराबाई यांनी पन्हाळ्यात आपली स्वतंत्र गाडी स्थापन केली. नंतर या दुसर्या गढीच्या संदर्भात १७१४ साली एक छोटीसी राज्यक्रांती कोल्हापूर येथे झाली. आणि राजारामाचा दुसरा पुत्र संभाजी (ई.स. १६९८ ते १७६०) यांना हि कोल्हापूरची गाधी मिळाली. नंतर शाहू महाराजांनी वारणेच्या तहानुसार १७३१ साली संभाजी राजास कोल्हापूरचा छत्रपती म्हणून मान्यता दिली.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
11
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: