गुरु वाणी: सगळा खेळ मनाचा !




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Guru Vani: Sagala Khel Manacha: . Gurur Brahmaa Gurur Vishnu Gurur Devo Maheshwarah Guru Saakshaata Parabrahma Tasmai Shri Guruve namah. words of guru dev. The credit of all my worldly and spiritual successes goes to my Gurudev. for spiritual life you need Gurudev.

Ekalvya_ki_Guru_Dakshina-guru-wani

संकल्प-विकल्प करणे हे मनाचे स्वरूप आहे. व निश्चय करणें हेम बुद्धीचे कार्य होय. * मन सदोदित कल्पनांच्या उत्र्म्डी रचित असतें आणि मोडीत असते. **या मनाच्या संगतीनेच आत्म्याला जीवदशा प्राप्त झाली आहें. *मी शरीर नव्हे,मी तत्वत: सो$हं सत्चितानंदपरमात्मा आहें. असा बुद्धीने जर यतार्थ निउश्च्य केला तर आणि त्या निश्चया पासून जर बुद्धी ढळली नाही,  तसेच ईतर कोणत्याही कल्पनांच्या आहारी न जातां ‘सो$हं’ हि एकच शुद्ध कल्पना मनानें घट्ट घरली तर, जीवदशेला आलेला आत्मा त्याच शुद्ध मनाच्या संगतीने पुन:आपल्या ऐश्वर्यातप्रतिष्ठीत होतो. * जर जल वायुच्या योगाने हालू लागलें कीं तें अनेक आकाराचें होते. त्याच प्रमाणे मनाच्या चंचलतेमुळें ध्यानामध्ये अनेक कल्पना उठतात. त्याचा आत्मविवेक पार नाहीसा होतो. * मनाच्या एकाग्रतेंवांचून ईतर सर्व उपाय व्यर्थ आहे. मन एकाग्र करण्याचा प्रसंग आला कीं मनाला मोठे भय वाटते. *त्याच प्रमाणे मन हे सो$हं ब्रम्हस्वरूपां मध्ये एकाग्र करेपर्यंत भीती असते,  ते एकदा एकाग्र झाले कीं मग भीती नाही.  तर उलट त्यांविषयी आनंद वाटू लागतो. * आपले शरीर हेंच गृह आहें हृद्य रति मन्दिर आहें व सो$हं ज्योतिरूप परमात्मा हाच पुरुष होय आणि मन हीच प्रकृति आहें. लोहचुंबक,  सुई हे अगदी स्वतंत्र पदार्थ आहेत पण सानिध्यामुळे लोहचुंबकाबरोबर सुई फिरू लागते अथवा घावत जावून त्याला चिकटते. तद्वत आपला आत्मा व मन हि दोन्ही स्वतंत्र व विलक्षण तत्वे आहेत तें अनुसंधानाच्या योंगानें मन ज्योतिरूप सो$हंमात्म्यामध्यें लीन होतें.  ज्याचें मन ज्योतिरूप सो$हंमात्म्यामध्यें लीन झालें आहे त्यांचें मन सो$हं भावानेंच सदा उन्मन्न राहते. उदा.–जशी शर्करा जलांत टाकली असतां ती आपले शर्करत्व सोडते व जलरूप होतें.  *तद्वत सो$हं भावानें मन उन्मन्नत्वास पावून तें ज्योतिस्वरूप परमात्म्यात विलीन होतें.  हींच ‘आत्मसिद्धी’ होय.

ज्या प्रमाणे उदकाच्या योगानेंच चिखल होतो, व उद्कानेच तो धुतला जातो. तद्वत प्राणी मनानेच कर्म करतो व मनानेंच त्यातून सुटतो. जसे फळाचें कारण पुष्प आहे, पण फळ आलें– कीं पुष्प नष्ट होतें.  त्याचप्रमाणे ज्ञान प्राप्तीसाठी कर्म आहें पण ज्ञान आलें कीं तें कर्म नष्ट होतें. –उदा.- आंब्यावर प्रथम जशी कडू व आंबट फळे असतात पण तीच पुढें गोड व रसाळ होतात,  प्रकार आपल्या मनाचा असतो. अंत:करण हा आम्रवृक्ष आहे व मन हे त्याचे फळ आहे पण ते कोवळे असे पर्यंत कडू व आंबट असते, पण हेंच मनोरूपी फळ स्थिर (पक्व) झालें असतां ब्रम्हरसरुपी माधुर्य त्यांत येतें त्या ब्रम्हरसाचें ज्ञानी उत्तम रीतीने सेवन करितात. सोहंब्रम्ह रस हा अतिशय मधुर आहें.   नर-नारींनी जीवन्मुक्त होण्याकरितां ह्या ब्रम्हरसांचे अखंड सेवन करावे. म्हणजेच सो$हं चे अखंड स्मरण करावें.

* मनाचे वशीकरण!

मन हें स्वभावत:च नादलुब्ध असल्यामुळें नादब्रम्हांत लुब्ध व तल्लीन होणें. * हा मनाचा मूळ स्वभावच आहे. सोहं मंत्र जप नेंहमी एकांतात व सुस्वर दीर्घ स्वरांत केल्यास मन पूर्णपणे वश व एकाग्र तल्लीन होते यांत अनुमात्र संदेह नाही. जे मन दुसऱ्या कोणत्याही उपायांनी वश व एकाग्र व तल्लीन होत नसेल ते फक्त सोहं मंत्र जपानें साघ्या व सोप्या – अनुभविक उपायाने अगदी सहज रीतीने लवकरच वश, एकाग्र व तल्लीन होते.

* उपवास खरा अर्थ ! आणि दिनचर्या !

खाण्या-पिण्याची प्रत्येक वस्तू, प्रथम सोहं अनन्य भक्ती भावानें अर्पण * सोहं ब्रम्हापण*  केल्याशिवाय  *कोणीही कदापि, कोठेही चुकून देखील काही खावुं, पिवुं नये असा नित्य अभंग नियमच प्रत्येकाने ठेवावा ! या दिव्य नियमाचरणाने – विषाचे देखील अमृत होते.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu