Nowdays Massage is becoming one of the most well known, well understood and popular … Overall relaxation, which is very important for helping to reduce stress, tension
आजकाल ताणतणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी मसाज उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. तश्या अर्थाच्या जाहिराती मसाज सेंटरवाले करीत असतात. वास्तविक मसाज हा ‘प्यसिव्ह’ प्रकारातील एक व्यायाम आहे. शारीरिक दृष्ट्या कमकुवत व्यक्तींसाठी मसाज उपयुक्त ठरतो. आयुर्वेदात तिळाचे तेल हे मसाजसाठी सर्वात चांगले समजले जाते.आणि हिवाळ्यात मोहरीचे तेल वापरले जाते. उष्ण वातावरणामध्ये मसाज करायचा असेल तर खोबर्याचे व सूर्यफुलाचे तेल उपयुक्त ठरते. वातप्रकृती असणाऱ्या लोकांनी मसाजासाठी तेल वापरताना ते गरम करून घ्यावे. पित्त प्रकृतीच्या लोकांनी मात्र मसाजासाठी थंड तेल वापरावा. कफप्रकृतीच्या लोकांसाठी मसाज करताना तेलाचा वापर शक्यतोवर करू नये. तेलाचा वापर आवश्यक असेल तर मोहरीचे तेल गरम करूनच वापरावे. म्साजाची सुरवात डोक्यापासून किंवा तळपायापासून करावी. सर्व प्रथम ज्या शरीराचा मसाज करायचा असेल तेथे तेल लावून ठेवावे व नंतर तळव्याने त्याभागाचे तेल जिरे पर्यंत मसाज करावा. मसाज करताना हात वरच्या दिशेने जातील असे बघावे. हातांची हालचाल सारख्या प्रमाणात व्हावी. मसाज करून घेत असताना पोट रिकामे असावे. मसाजासाठी सर्वात चांगला वेळ सकाळी किंवा सायंकाळची आहे. म्साजा नंतर लगेचच तेल धुवू नये २० ते ३० मिनिटे तसेच ठेवावे. कारण हे तेल त्वचेमध्ये झिरपू द्यावे. त्या नंतरच धुवावे. मसाज झाल्या नंतर थोडी झोप २० ते ३० मिनिट घ्यावी. ते अति उत्तम आहे.