कोची येथील नेहरू स्टेडीयम वर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने वेस्टइंडीज वर ६ विकेट नि दणदणीत विजय मिळवला आहे. वेस्टइंडीज संघाने भारतासमोर २१२ धावांचे आव्हान ठेवले आहे. भारतीय गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजचा संघ अवघ्या ४८.५ षटकात २११ धावांवर गारद झाला.
वेस्ट इंडिजकडून सर्वाधिक धावा फलंदाज डॅरेन ब्राव्होने काढल्या. ब्राव्होने ५९ धावा केल्या. जॉन्सन चार्लेसन (४२), मार्लन सॅम्युल्सन (२४), एलएमपी सिमन्स (२९), एन देवनरेन(४), डॅरेन सॅमीने ५ धावा केल्या. तर, ख्रिस गेल अवघ्या शून्य धावेवर बाद झाला. त्याला गोलंदाज भुवनेश्वर कुमारने धावचीत केले. भारताकडून गोलंदाज सुरेश रैना आणि जडेजाने प्रत्येकी तीन बळी घेतले, तर आर आश्विनने दोन आणि मोहम्मद शमीने एक बऴी घेतला.
त्यानंतर मात्र भारताची सुरवात थोडी खराब झाली. शिखर धवन ५ धावा काढून बाद झाला. पण त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने ने रोहित शर्माच्या सोबतीने भारताचा डाव सावरला. रोहित शर्मा ७२ धावा काढून बाद झाला. तर त्यानंतर आलेल्या युवराज सिंग ने सावध खेळ करताना १६ धावा काढल्या व तो शेवटपर्यंत नॉट आउट राहिला. विराट कोहली ने ८६ धावा केल्या त्यात ९ चौके व दोन उत्तंग षटकार त्यांनी मारले आहेत. विराट कोहली ८६ धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या सुरेश रैना ० धावांवर तंबूत परतला. पण त्यानंतर आलेल्या महेंद्र सिंग धोनीने युवराज सिंग च्या साथीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्बत केले. भारतानी ३५.२ शतकात ४ विकेटच्या मोबदल्यात हा विजय संपादित केला.Virat Kohli, Rohit Sharma script Indian win after spinners destroy , Virat Kohli (86), Rohit Sharma (72) guide India to six-wicket win vs West Indies (211) in Kochi, lead three-match series 1-0.