काँग्रेसकडून शिवसेना टार्गेट
Like
Like Love Haha Wow Sad Angry

rahul gandhi

काँग्रेस विरूद्ध नरेंद्र मोदी अश्या प्रकारचे राजकीय रंग आतापर्यंत आपण पाहत होतो. पण आता मात्र असे असतानाच काँग्रेसने शिवसेनेला टार्गेट केले आहे. शिवसेनेला टार्गेट करताना मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला झुकते माप दिल्याचे दिसून येत आहे आहे. त्यामुळे सध्या तरी राजकीय वर्तुळात या गोष्टीची जोरदार चर्चा आहे.

देशातील स्थलांतराच्या मुद्द्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भूमिका मांडली. राहुल गांधी यांनी रविवारी नवी दिल्लीत झालेल्या जाहीर सभेत शिवसेनेला लक्ष्य केले. मात्र, याच मुद्यावर गेले काही वर्षे आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसेचा उल्लेख त्यांनी जाणीवपूर्वक का टाळला आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला यश मिळवून देण्यात मनसे हा महत्त्वाचा घटक असल्यानेच राहुल गांधीनि मनसेचा उल्लेख टाळला असल्याची शक्यता आता वर्तविण्यात आली आहे.

परप्रांतीयांना महाराष्ट्रात त्रास दिला जातो आणि त्यासाठी शिवसेनेचा पुढाकार असतो, असे राहुल गांधी यांनी दिल्ली निवडणूक प्रचारात म्हटले आहे. परप्रांतीयांवरून राहुल गांधी यांनी शिवसेनेवर टीकाही केली. शिवसेनेने १९७०च्या दशकात परप्रांतीय आणि विशेषत: दाक्षिणात्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. पुढे मात्र शिवसेनेने हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यावर शिवसेनेचा प्रांतीयवाद काहीसा मावळला असे राहुल यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे.

तर गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टॅक्सीचालक आणि फेरीवाल्यांना चोप दिल्यावर त्याची राष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया सुद्धा उमटली होती. परप्रांतीयांच्या मुद्दय़ावर नेहमीच राज ठाकरे यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांकडून टीका करण्यात आली आहे. परंतु राहुल गांधी यांनी दिल्लीतील परप्रांतीय मतदारांना आपलेसे करण्याकरिता शिवसेनेवर टीका केली व मनसेला मात्र झुकते माप दिले गेल्याचे बोलले जात आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी शिवाजीपार्कवर कॉंग्रेसचा एकही नेता उपस्तीत नव्हता  . आणि नेमके त्याच दिवशी राहुल गांधी यांनी शिवसेनेला लक्ष्य केल्याने काँग्रेस नेत्यांचा निर्णय योग्यच ठरला. या वेळच्या निवडणुकीत काँग्रेससाठी मनसे फार महत्त्वाचा आहे! गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेच्या प्रभावामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा झाला होता. त्यामुळे मनसेला राहुल यांनी दुखावण्याचे टाळले असावे, असे म्हटले जात आहे.

राज ठाकरे यांच्यामुळे तिरंगी लढत झाल्यास ती काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार आहे. मध्यंतरी राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना मनसेचा उल्लेख केला होता. मनसे कोणती भूमिका घेते यावर काँग्रेस-राष्ट्रवादीचे बारीक लक्ष आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेताच राहुल गांधी यांनी परप्रांतीयांच्या मुद्दय़ावरून राज ठाकरे किंवा मनसेचा उल्लेख टाळलेला असावा, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातो.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu