गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेला ‘गोलियोंकी रासलीला : रामलीला’ हा चित्रपट पुन्हा वादाच्या भोव-यात सापडला आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’ या चित्रपटाच्या उत्तर प्रदेशातीत प्रदर्शनावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे.
‘रामलीला’ या चित्रपटात आक्षेपार्ह दृष्ये आणि संवाद असल्याचा आरोप करत येथील मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामलीला समितीने चित्रपटाला विरोध करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. तसेच, या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र रद्द करावे आणि चित्रपटातील आक्षेपार्ह संवाद काढून टाकावे अशी मागणी या समितीने १ नोव्हेंबरला केली होती. चित्रपटाच्या ‘रामलीला’ या नावामुळे हिंदुच्या भावना दुखावल्या असून चित्रपटामुळे ‘रामलीला’ या नावाचा चुकीचा संदेश समाजात जात असल्याचेही या समितीने याचिकेत म्हटले होते. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश देवी प्रसाद सिंह व अशोक पाल सिंह यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेशातीत चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याचा निर्णय दिला.
या आधीही ‘रामलीला’ या चित्रपटाच्या विरोधात जयपूर आणि दिल्लीतील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.Allahabad High Court bans screening of film ‘Ram-Leela’ in Uttar Pradesh, The Allahabad High Court on Thursday (November 21) banned the screening of Sanjay Leela Bhansali’s film.