Your views about the todays youngsters This articles is about sharing your views about the today’s youngsters. how they live a life. youngsters and there life. every
आजच्या तरूणपीढी बद्दल तुमचे काय मत आहे मिञानो नक्की सांगा…
माझे मित्र नवनाथजी यांनी सुंदर नी चांगला प्रश्न उपस्थित केला आहे. आजची तरुण पिढी खरोखर सुषर, कर्तबगार आहे. जे काम हाती घेतील ते मन लावून करतील यात शंका नाही. यात काही अपवाद असतीलही. पण असे अपवाद अनेक ठिकाणी पाहण्यात येतात. अशी अपवादात्मक स्थिती येऊ नये यासाठी पालकांनी जागृत असावयास हवे. अपवाद जर दिसून येत असतील तर ते पालकांमुळे असेच मी म्हणेन. तरुण पिढीनी आपल्या मर्यादा ओळखून वागावयास हवे. हे निश्चितपणे त्यांच्या हिताचे आहे. दुस-याचे जे चांगले आहे ते जरूर आत्मसात करावे. दुस-याचे विचार – आचार वाईट आहेत म्हणून असलेली मैत्री तोडू नये तर उलट त्याला योग्यरित्या समजावून सांगून त्या मित्र मैत्रिणीच्या सानिध्यात राहावे. जेणे करून सहवासाचा परिणाम त्यांच्यावर होवून त्यांच्या स्वभावात बदल होईल. वाल्याचा वाल्मिकी झाला तर आनंदाचं आहे. मात्र वाल्मिकीचा वाल्या होता कामा नये असे माझे स्पष्ट मत आहे. या माझ्या मताशी आपण निश्चित सहमत व्हाल याची खात्री मला आहे. प्रत्येक व्यक्तीची विचार क्षमता ही वेगवेगळी आहे. काहींना माझे विचार पटतील काहींना नाही. प्रत्येकाला विचार मांडण्याचे स्वातंत्र आहे. आजच्या तरुण पिढीसाठी प्रत्येकांनी आपले विचार मांडणे गरजेचे आहे. आजच्या पिढीला चांगला मार्ग दाखविणे हे आपले कर्तव्य आहे. या कर्तव्यास विसरून चालणार नाही असे मला वाटते. उगाचच आजच्या तरुण पिढीला नावे ठेऊन आजची पिढी वाईट मार्गाकडे वळली आहे असे म्हणणे चुकीचे होईल. हरी ओम.
प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, १८१०२०१३.