तुळजा भवानी मंदिर तुळजापूर




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Shri Tuljabhavani Mandir Sansthan Tuljapur. Shri Kshetra Tuljapur, the one amongst three and half Shakti Peethas of the state, is situated in the Osmanabad district

tulja bhavani

महाराष्ट्रात देवीची एकूण साडेतीन पीठे आहेत. त्यातील सर्वात महत्वाचे पूर्णपीठ म्हणजे उस्मानाबाद जिल्हातील श्रीक्षेत्र तुळजापूर हे आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि मराठी लोकांचे  कुलदैवत असणार्‍या देवीचे हे स्थान जागृत असून नवसाला पावणारे आहे. संकटाला धावून येणार्‍या तुळजाभवानी आई चे इतिहासातही दाखले सापडतात. हिंदवी साम्राज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजाभावनीचे निस्सीम भक्त होते. कुठल्याही नवीन कामाला सुरवात करण्यापूर्वी महाराज दरवेळी भवानीचे दर्शन घेत असत. शिवाजी महाराज्यांच्या  भक्तीवर प्रसन्न होऊन साक्षात आईने महाराजांना तुळजाभवानी तलवार प्रदान केल्याचे इतिहासात सांगितले जाते. तुळजापूरला आधी चिंचपूर या नावानेही ओळखले जात असे. कारण या भागात चिंचेची फार मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. श्री क्षेत्र तुळजापूर हे मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात डोंगर पठारावर वसले आहे. त्याची समुद्रसपाटी पासूनची उंची हि  २७० फुट आहे. तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. ते तेथून १८ किलोमीटर तर सोलापूर वरून  ४४ किलोमीटर लांब आहे.

तुळजा भवानी मंदिर

पुरातन काळातील या मंदिरात प्रवेश करण्यासाठी दोन मोठी प्रवेश द्वारे आहेत. या मंदिराच्या पहिल्या प्रवेशद्वारास राजे शिवाजी महाद्वार तर दुसऱ्या महाद्वारास राजमाता जिजाऊ महाद्वार असे म्हटल्या जाते. मंदिराचे बांधकाम हे संपूर्ण काळ्या दगडाचे आहे. मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या उतरून जावे लागते. मंदिरात प्रवेश करताच गोमुख तीर्थ आहे, दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक या गोमुख तीर्थामध्ये आंघोळ करतात तसेच हातपायही धुतात. त्यासमोर कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी तीन तीर्थ एकत्र आली आहे असा इतिहासामध्ये उल्लेख आहे. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धीविनायक आहे. येथेच आदीशक्ती आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही लक्षवेधून घेतात. मंदिराच्या प्रशस्त आवारात भाविकांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. येथूनच श्री तुळजाभवानी देवी मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या मुख्य गाभार्‍याचा दरवाजा हा संपूर्ण चांदीच्या पत्र्याने मढविला असून, त्यावर सुरेख असे नक्षीकाम करण्यात आले आहे. आणि या दरवाज्यातूनच  श्री तुळजाभवानीचे दर्शन होते. भवानीची प्रसन्न आणि तेजस्वी काळा पाषाणाची मूर्ती आपल्याला येथून दिसून येते. तुळजाभवानीची मूर्ती तीन फुट उंचीची असून ती स्वयंभू आहे. अष्टभुजा महिषासूरमर्दिनी सिंहासनावर उभी असून, भवानीच्या मस्तकाच्या मुकुटातून केसांच्या लट बाहेर आलेल्या आहेत. तुळजा भवानीच्या आठ हातामध्ये त्रिशूळ, बिचवा, बाण, चक्र, शंख, धनुष्य, पानपात्र आणि राक्षसाची शेंडी आहे. तिच्या पाठीवर बाणाचा भाता असून देवीच्या मुख्याच्या उजव्या व डाव्या अंगाला चंद्र व सुर्य आहेत. तुळजाभवानीचा उजवा पाय हा महिषासून राक्षसावर तर डावा पाय जमिनीवर दिसून येतो. तिच्या दोन पायांच्यामध्ये महिषासूर राक्षसाचे मस्तक आहे. देवीच्या उजव्या बाजूला मार्केंडेय ऋषी व सिंह, तर डाव्या बाजूस कर्दम ऋषीची पत्नी अनुभूती दिसून येते.

श्री तुळजाभवानी देवीची मुर्ती हि चल मुर्ती आहे. येथे उत्सव मूर्तीची मिरवणूक न काढता प्रत्यक्ष श्री तुळजाभवानी देवीच्या मुर्तीची पालखीत बसवून मंदिराभोवती मिरवणूक काढली जाते. वर्षातून एकूण तीन वेळा मुर्ती सिंहासनावरून हलवून तिला गाभार्‍याबाहेर असलेल्या पलंगावर ठेवली जाते. नंतर विजयादशमीच्या दिवशी सिमोल्लंघनाच्या वेळी आईची पालखीतून मिरवणूक काढली जाते. देवीच्या पालखीसोबत श्रीयंत्र, खंडोबा आणि महादेवाची हि मिरवणूकही काढली जाते. प्राचीन काळात आद्य शंकराचार्यांनी श्रीयंत्रावर देवीच्या मूर्तीची स्थापना केल्याचे सांगितले जाते. तुळजाभवानीचे मंदिर हेमाडपंती असून त्यात कोरीव काम करण्यात आले आहे. मंदिराच्या गाभार्‍यातच एका खांबावर चांदीचा कडा आहे. सात दिवस त्यास स्पर्श केल्याने जुनाट आजार बरे होतात अशी आईच्या  भाविकांची श्रद्धा आहे.

तुळजा भवानीचे पुराणातील उल्लेख

तुळजाभवानीबाबत पुराणामध्ये महत्त्वपूर्ण माहिती मिळते. मार्कंडेय पुराणात सुद्धा तुळजाभवानीचा उल्लेख आढळतो. दुर्गा सप्तशतीमध्ये तेरा अध्याय आणि सात हजार श्लोकांद्वारे देवीचे महात्म्य वर्णन करण्यात आले आहे. दुर्गा सप्तशती हा ऋषी मार्केंडेय यांनी रचलेल्या मार्कंडेय पुरानाचाच एक भाग आहे. याशिवाय देवी भगवतीमध्येही तुळजाभवनीचे महत्व सांगण्यात आले आहे. तुळजाभवानीबद्दल पुढील अख्यायिका प्रसिद्ध आहे. स्कंध पुराणात देवीची अवतारकथा वर्णन करण्यात आली आहे. कृत युगात कर्दम ऋषी आणि त्यांची पत्नी अनुभूती एका मुलासह राहत असत. अनुभूती ही रतीप्रमाणेच सुंदर आणि सुशील होती. कर्दम ऋषीच्या निधनानंतर तिने सती जाण्याचे ठरविले मात्र तेवढात आकाशवाणी झाली. लहान मुल असल्यामुळे सती जाण्याची गरज नाही असे आकाशवाणीत सांगण्यात आले. यामुळे अनुभूतीने सती जाण्याचा निर्णय रद्द करीत मंदाकिनी नदीच्या काठी लहान मुलाला घेऊन तपश्चर्येला सुरुवात केली. यावेळी कुकूर नावाच्या राक्षसाची वाईट नजर तिच्यावर पडली.

सुरुवातीला त्याने तिला खूप त्रास दिला. नंतर त्याने तिचे पातिव्रत्य भंग करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनुभूतीने देवीकडे प्रार्थना केली. मला या राक्षसापासून वाचव, संकटातून सोडव अशी अनुभूतीची याचना ऐकून देवी त्वरीत प्रकट झाली. या देवीला त्वरीता असे नाव देण्यात आले. मराठी याचाच अपभ्रंश होऊन तुळजाई असे देवीचे नाव झाले. तुळजाईलाच भक्तगण तुळजा भवानी असेही म्हणू लागले. अनुभूतीच्या मदतीला प्रकट झालेल्या देवी मातेने राक्षसाला ठार मारले. अश्विन शुद्ध दशमीच्या दिवशी देवी मातेने कुकूर राक्षसाचा वध केला. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जाऊ लागला. यानंतर अनुभूतीने देवीस कायमस्वरुपी तिथेच वास्तव्य करण्याची विनंती केली. त्याच ठिकाणाला तुळजापूर असे नाव पडले.

Check out the picture and other information about the Tulja Bhawani Mandir, Tuljapur.  the one amongst three and half Shakti Peethas of the state, is situated in the Osmanabad district.

Tuljabhavani

Tuljabhavani

Tuljabhavani

Tuljabhavani

Tuljabhavani

Tuljabhavani

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu