शनिवारवाडा पुणे




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Shaniwarwada is an eighteenth century fortification in the city of Pune in Maharashtra, India. Built in 1732. Shaniwarwada has five gates:

  • Dilli Darwaza
  • Mastani Darwaja (Mastani’s Gate) or Aliibahadur Darwaja, facing north
  • Khidki Darwaja (Window Gate), facing east
  • Ganesh Darwaja (Ganesh Gate), facing south-east
  • Jambhul Darwaja or Narayan Darwaja (Narayan’s Gate), facing south

To know complete information read Below paragraph.

shanivarvada

शनिवार वाडा पुणे
शनिवार वाडा महाराष्ट्रातील पुणे शहरातील एक ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.१८ व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, म्हणजेच पेशव्यांचे निवासस्थान होते. त्यानंतर १७ जून १९१९ रोजी भारत सरकरने शनिवारवाड्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
शनिवार वाड्याच्या महालाच्या बांधकामाची सुरवात १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाली, तर ते  २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. १७३२ नंतरही या महालात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाच्या दरवाज्याचे काम पूर्ण होण्यास १७६० हे वर्ष उजाडले होते. या महालामध्ये १८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी इतिहासात सापडतात, १७ नोव्हेंबर १८१७ ला हा वाद ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली गेला. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्‍टर हेन्‍री डंडास रॉबर्टसन यांचे वास्तव्य होते. त्यानंतर या वाड्यात काही काळ तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. इ. स. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व या आगीत संपून वाद जाळून खाक झाला. त्यानंतर चक्क ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर करण्यात आला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ च्या पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली होती.
शनिवारवाड्यात अनेक घटना, दुर्घटना घडलेल्या आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत असत. शनिवारवाड्यात राजकारणाचे येथे फड रंगत असत; पेशव्यांचा दरबारहि येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यातून होत असत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमायचे. पुढे येथे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली होती.
शनिवार वाडा हा पहिल्या बाजीरावाने बांधला. असा चुकीचा ईतिहास काही ब्राम्हण संशोधकांनी मांडला होता. परंतु शनिवार वाडा हा खरा लाल महाल आहे. असे संशोधनावरून पुढे आले आहे. पेशवे हे नोकर असल्याने त्याना राजवाडा बाधांयचा अधिकार नाही असे इतिहासात नमूद आहे. राजामाता जिजाऊनी बांधलेला लाल महाल मह्मजेच शनिवारवाडा होय. पेशव्यांनी लालमहालचा जीणेद्धार करून  लालमहालाचे नामकरण शनिवारवाडा असे ठेवण्यात आले होते. शनिवारवाड्याच्या बांधकामाची सुरूवात १० जानेवारी १७३० रोजी झाली होती. त्याकाळात १६,०१० रुपये खर्च करून शनिवार वाड्याचे काम पूर्ण झाले होते, शनिवार वाड्याचे बांधकाम २२ जानेवारी १७३२ रोजी पूर्ण झाले. इ.स. १८२८ साली लागलेल्या आगीत हा सात मजली वाडा पूर्णपणे जळून खाक झाला. त्यामुळे मूळच्या स्वरूपातील वाडा आपण आज पाहू शकत नाही. या वाड्याच्या चौथर्‍यावर बसविलेल्या छोट्या फलकावरून एकेकळी येथे असलेल्या गणेश महाल, रंगमहाल, हस्तिदंतीमहाल, दिवाणखाना, कारंजे इत्यादी गोष्टींची कल्पना करता येते.

इमारत
शनिवारवाड्याचे अंतरंग
शनिवार वाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. वाड्याच्या जवळूनच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज आहेत व त्या सर्व बुरुजांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी ‘पागेचा बुरूज’ आतून पोकळ आहे. त्याच्या पायथ्याच्या मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे त्या खड्यात तोफांचे गोळे ठेवले जात असत. वाड्याच्या तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे दिली गेली आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधॆ असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते अतिशय भक्कम बनवलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १०००हून अधिक नोकर होते.
दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा आज एवढाच तो शिल्लक राहलेला आहे. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतमध्ये काय सुरु, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक हा  नागमोडी रचनेत करण्यात आला आहे.

shanivarvada

 shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

shanivarvada

Shaniwarwada is a palace fort in the city of Pune in Maharashtra, India. Built in 1746, it was the seat of the Peshwa rulers of the Maratha Empire. Shaniwar Wada is one of the famous monuments in Pune. Shanivarwada Pune, Maharashtra.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu