Rashtrapita Mahatma Ghandhi.Read complete biography and history of Rashtrapita Mahatma Gnadhi. Date of birth, work and all social activities of Mohandas Karamchand Gandhi.
जन्म: ऑक्टोबर २, इ.स. १८६९
पोरबंदर, काठियावाड, भारत
मृत्यू: जानेवारी ३०, इ.स. १९४८
नवी दिल्ली, भारत
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: अखिल भारतीय काँग्रेस
प्रमुख स्मारके: राजघाट
धर्म: हिंदू
पत्नी: कस्तुरबा गांधी
अपत्ये: हरीलाल, मणिलाल, रामदास,देवदासमहात्मा गांधी (मोहनदास करमचंद गांधी) (Mahatma Gandhi Also Know as Mohandas Karamchand Gandhi)
महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. महात्मा गांधी या नावाने ते संपूर्ण जगात ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला सुद्धा प्रेरित केले, आणि संपूर्ण जगाला अहिंसेचा उपदेश दिला. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा म्हणजेच ‘महान आत्मा’. भारतात त्यांना प्रेमाने बापू म्हणतात आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता म्हणून संबोधले. ते भारतीय सत्याग्रहाचे जनक होते. २ ऑक्टोंबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून तर जगामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.
१९१५ मध्ये गांधीजी भारतात परत आल्यावर त्यांनी चाम्पारान्या मधील शेतकऱ्यांना जुलुमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ मध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची सुत्रे सांभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन, आर्थिक स्वावलंबन, स्त्रियांचे समान हक्क, सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वराज्य यासाठी देशभरात चळवळी सुरु केल्या. गांधीजीनि आयुष्यभर साम्प्रदायीकतावादाचा (सम्प्रदायांवर राजकारण करणे) विरोध केला आणि ते मोठ्या प्रमाणात सर्व धर्म आणि पंथ यांच्यापर्यंत पोहोचले. त्यानंतर त्यांनी खिलाफत चळवळीला प्रोत्साहन दिले आणि ते मुस्लिमांचे नेते बनले.१९३० मध्ये त्यांनी मिठावरील कराविरोधात ४०० कि.मी. (२५० मैल) लांब दांडी यात्रेचे प्रतिनिधित्व केले. १९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध भारत छोडो आंदोलन चालू केले. त्यांनी यासाठी कितीतरी वेळा तुरुंगवास भोगला आहे.
गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा यांचा पुरस्कार केला, स्वतःही याच तत्त्वांनुसार जगले आणि इतरांनीही तसे करावे असे सुचवले. त्यानी खेड्यांना संघटीत केले आणि त्यांच्या स्वयंपूर्णतेचा पुरस्कार केला. ब्रिटनमधील विसटर्न चर्चिल याने त्यांची “अर्धनग्न फकीर” म्हणून त्यांचा अपमान केला. गांधीजी स्वतः कातलेल्या सुताचे धोतर आणि शाल घालत असत. त्यांनी आयुष्यभर शाकाहाराचा अवलंब केला आणि अनेकदा त्यांनी आत्मशुद्धीसाठी आणि राजकीय चळवळीसाठी साधन म्हणून दीर्घ उपवास केले.