या विश्वात अशक्य असे काहीच नाहीये




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

Nothing is impossible in this world, its a old saying. if we work hard then you can easily gets the repay of your work. by working hard we can win anything in the world.

                                                                    लिहू वाचू आनंदे…
Impossible_Nothing marathi article
जर विचार करा. या विश्वात अशक्य असे काहीच नाहीये. फक्त आपल्यामध्ये जबरदस्त इच्छाशक्ती हवी. कुठलेही काम करण्याची तयारी हवी. कामाला दर्जा नसून काम म्हणजे काम. मग ते हलक्या किंवा उच्च दर्जाचे असले तरी ते काम आपण कसे करतो, किती वेळात करतो हे महत्वाचे आहे. एखादे काम हलक्या दर्जाचे आहे , हे काम मी कसे करू, कोण काय म्हणेल असा विचार केलात, काम केले नाहीत तर त्या कामातील अनुभव आणि आनंद आपल्याला मिळणार आहे का? निश्चितपणे नाही मिळणार. याकरिता कुठलेही काम असो ते काम करण्यानी आपल्याला कुठलाही कमीपणा येणार नाही, उलट ते काम करतांना आलेल्या अडचणी, लागलेला कालावधी यामधून आपल्याला खूप काही शिकता येईल. आपली पत्नी घरात रोज केर काढते. तिने असा विचार केला कि मी नोकरी करते, हे केर काढण्याचे काम हलक्या दर्जाचे आहे हे मी कसे करू, तर अशा तिच्या विचारांमुळे ती घरात बसून राहिली तर घरातील केरकचरा निघेल का? नाही निघणार.

महिलांनी केरकचरा काढण्याची मक्तेदारी नाही घेतलेली. एक दिवस आपण पुरुषांनी घरातील केरकचरा काढला, तरच आपल्याला केरकचरा काढण्यासाठी लागणारे श्रम कळून येतील आणि या कामातून मिळणारा आनंदाचे क्षणही अनुभवता येतील. म्हणूनच कामाचा दर्जा न पाहता काम करावे नी त्या कामातून आनंद घ्यावा. घरातील पुरुषांना वाटत असेल की हे काम आपल्याला जमणार नाही, आपले हसे होईल, तर असा विचार करणे चुकीचे आहे. आज पुरुषांबरोबर महिलाही चांगल्याप्रकारे कुठलेही काम चांगल्या प्रक करू शकतात याचा अनुभव आपल्याला आलेला आहे. तेव्हा कुठलेही काम करण्यात आपण मागे राहू नये असे मला वाटते. आपण काय सांगाल बर.

प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, ०३१०२०१३.

 

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा