काँग्रेसने महात्मा गांधी यांचे स्वप्न धुळीस मिळविले, अशी घणाघाती टीका ज्येष्ठ समाजवसेवक अण्णा हजारे यांनी गांधी जयंती दिनी काँग्रेसवर केली. देशात लोकशाही नांदावी असे महात्मा गांधी यांचे स्वप्न होते मात्र आज देशात लोकशाही नांदत नसल्याने महात्मा गांधींचे स्वप्न मातीमोल झाले आहे. गांधी जयंती दिनाचे औचित्य साधून अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या पुतळयाला अभिवादन केले आणि श्रध्दांजली वाहिली. यावेळी अण्णा गांधीजींच्या पुतळयासमोर ध्यानस्तही बसले होते. श्रध्दांजली वाहिल्यानंतर अण्णा हजारे यांनी केंद्रातील काँग्रेस सरकारवर टीका केली. सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या गुन्हेगार लोकप्रतिनिधीच्या अध्यादेशाच्या प्रश्नावर अण्णा म्हणाले की, लोकशाही देशात गुन्हेगार लोकप्रतिनिधींना संसदेत कोणत्याही प्रकारे स्थान नसायला पाहिजे. गुन्हेगार लोकप्रतिनिधींची संसद ही जागा नाही. त्यामुळे आपला याला विरोध आहे असे अण्णा म्हणाले.