रांची : चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरविण्यात आलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या शिक्षेचा निकाल आज गुरुवारी दुपारपर्यंत होणे अपेक्षित आहे. १७ वर्षे जुन्या एका चारा घोटाळा प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने लालूप्रसाद व अन्य ४५ आरोपींना दोषी ठरविले आहे. आज कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.