Kojagiri Pornima This festival is one of the most popular and important festivals of Odisha. Sharad Purnima, also known as Kojaagari Purnima, is celebrated on the full moon.
आज कोजागिरी पोर्णिमा आहे. पण त्याआधी आपण कोजागिरी पोर्णिमा म्हणजे काय ते जाणून घेऊ. कोजागिरी म्हणजे कोण जागे आहे, असे आज लक्ष्मी विचारते असते. आपल्या कर्तव्याला कोण जागे आहे, जो जागा असेल त्याला लक्ष्मी धन देते म्हणून आपण कोजागिरी सण साजरा करतो.
कोजागिरी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्सहाने साजार केला जातो. पावसाळ्या नंतरची ही पहिलीच पौर्णिमा असते हिला अश्विन पौर्णिमा सुद्धा म्हटल्या जाते, पावसात आकाश स्वछ नसते परंतु या पौर्णिमेला आकाश खूप दिवसानंतर स्वछ आणि सुंदर दिसते. त्यामुळे या पौर्णिमेचा आनंद घेण्यासाठी व हिवाळ्याचे स्वागत करण्यासाठी म्हणून हा सण साजरा करतात. या दिवशी पोहे व शाळेचे पाणी प्रसाद म्हणून वापरतात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री दुध गरम करून त्यामध्ये चंद्राला पाहतात.कारण दुध ही पांढरा शुभ्र असते व चंद्र ही त्या दिवशी ९९.९९ % प्रकाशमान झालेला असतो. चंद्र आजच्या दिवशी पृथ्वी पासून ३ लक्ष ८५००० किलो मीटर अंतरावर असतो. त्यामुळे या रात्री वातावरण छान असते आकाश खुले असते म्हणून. आणि सर्वात म्हत्वाचे म्हणजे २००५ नंतर कोजागिरीच्या पौर्णिमेच्या वेळीस चंद्रग्रहण आले आहे. हे छाया कल्प चंद्र ग्रहण आहे. या ग्रहांना मध्ये चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेत येतो. हे चंद्र ग्रहण दुपारी ३.१८ मिनिटांनी सुरु होत आहे. ५.२० मिनिटांनी हे चंद्र ग्रहण जास्त प्रमाणात दिसणार आहे. आणि ७. ३३ मिनिटांनी हे चंद्र ग्रहण संपणार आहे.
भारता बरोबर अमेरिका, युरोप व आफ्रिका येथून हे ग्रहण दिसणार आहे. आणि हे चंद्र ग्रहण आपण आपल्या डोळ्यांनी सुद्धा पाहू शकतो. यासाठी यासाठी आपल्याला कोणताही चष्मा वापरण्याची हि गरज नाही. या नंतर २०१४ व २०१५ मध्ये ही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हे चंद्र ग्रहण असणार आहे.