उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातील किल्यातील १००० किलो सोन्याच्या खजिन्याचे काम आज चौथ्या दिवशी हि सुरूच आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास स्पष्ट नकार दाखविला आहे.
राजा राम बख्श सिंह यांच्या किल्यातील परिसरात एक हजार टन सोनं मिळवण्यासाठी खोदकाम सुरू आहे. हे संपूर्ण काम ‘एएसआय’च्या देखरेखीखाली होत आहे. डौडियाखेडा या गावामध्ये असलेल्या या किल्ल्यात आत्तापर्यंत पावणे चार फूट खोलपर्यंत खोदकाम झालेलं आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात आज एका जनहित याचिकेवर सुनावणी करण्यात आली. डौंडिया गावात सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) कडून केल्या जाणाऱ्या खोदकामावर नजर ठेवण्याचा आग्रह या याचिकेत करण्यात आला होता.या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेशातल्या उन्नाव गावात सोन्याच्या शोधार्थ सुरु असलेल्या या खोदकामत हस्तक्षेप करण्यास नकार दिलेला आहे. आतपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, एएसआयला आत्तापर्यंत या खोदकामात जवळजवळ एक डझन पुरातन काळातील वस्तू मिळाल्यात. या खोदकामात आत्तापर्यंत काही वीटा, काही भाडी आणि इतरही काही वस्तू मिळाल्यात.
१८ ऑक्टोबरपासून सरू झालेले हे खोदकाम पहिल्या दिवशी १५ सेंटीमीटर, दुसऱ्या दिवशी ५५ सेंटीमीटर तसंच तीसऱ्या दिवशी ३२ सेंटीमीटर पर्यंत झालेलं आहे. सोनं न मिळाल्यानं खोदकाम बंद करण्यात आलंय, अशी अफवाही काल या खेड्यामध्ये पसरलेली होती. खोदकाम सुरू असलेल्या जागेवर मीडियाला प्रतिबंध करण्यात आलेला आहे.
दरम्यान, ग्राम प्रधान अजयपाल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार खोल खोदल्यानंतर त्या जागेवर रविवारी एक भिंत मिळालेली आहे. या भिंतीला सुरक्षित ठेवण्यासाठी खोदकाम आता हळुवार पने सुरु आहे.
या जागेवर पुरातत्व विभागाने १८ ऑक्टोबरपासून खोदकाम सुरू केलंल आहे. साधू शोभन सरकार यांनी पाहिलेल्या स्वप्नाच्या आधारावर १९ व्या शतकातील किल्ल्याच्या आतल्या भागात हे खोदकाम सुरू आहे. साधूनं, आपल्या स्वप्नात राजानं येऊन किल्ल्याच्या आतमध्ये एक हजार टन सोनं असल्याचं दावा केला होता. त्यानंतर हे खोदकाम सुरू करण्यात आलंय.