काँग्रेस स्वत:च्या बळावर निवडून येऊ शकते असा आत्मविश्वास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी कार्यकर्त्यांपुढे व्यक्त केल्याचे वृत्त आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आपल्याला आवश्यकता नाही असे वक्तव्य त्यानी आज केले. सध्या राहूल गांधी महाराष्ट्राच्या दौ-यावर असून त्यांनी पवारांशिवाय सत्ता शक्य असल्याचा मंत्र कार्यकर्त्यांना दिला आहे. पण त्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सक्षम करण्याची गरज असल्याचे त्यानी आवर्जुन म्हटले आहे. राज्यामध्ये सध्या चालू असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या शाब्दिक चकमकीच्या पार्श्वभूमीवर राहूल गांधींच्या वक्तव्याला फार महत्त्व प्राप्त झाले आहे. राहूल गांधींच्या वक्तव्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राहूल गांधींनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना असा आत्मविश्वास दाखवणे योग्य असल्याचे सांगितले.
राहुल गांधींच्या या वक्तव्यावर अजुन तरी शरद पवार यानि कहिहि प्रतिक्रिया दिलेली नाही तरीही सध्या तरी सर्वांचे लक्ष त्यांच्याकडेच लागलेले आहे.