चिंतन आत्मशुद्धी
Like
Like Love Haha Wow Sad Angry

ReThink Your Life: A Unique Diet to Renew Your Mind , the life becomes very heavy day by day and we all need to be very careful about the silent mind. its very important for your life to keep your mind silent.
chintan atmashudhi

आपले मन केवळ वासना समुच्चय आहे हजारो दिशांना आपले मनोविकार सारखे धावत असतात. मनाची धाव सारखी बाहेर असते त्या करीता अंर्तमनाशी सुसंवाद साधला पाहिजे. अंर्तमुख बनले पाहिजे, तरच काही साधेल. मानवीजीवन म्हणजे पुर्णावस्तेत जाउन पोचण्यास कराव्या लागणार्या प्रयत्नांची पाठशाला आहे. आत्मानात्म विवेक करून देहातादात्म सोडविले पाहिजे. पैशाच्या उबेपेक्षा माणुसकीच्या सौहार्द्र्याचा,सामंजष्याचा ओलावा माणसा जवळ नेहमीच असावा. त्यामुळेच जीवन जगणे सुखावद होते. पैशामुळे जीवनावश्यक वस्तू विकत घेता येतात. त्यादृष्टीने पैशाचे महत्व आहेच पण माणुसकी किंवा मानवते पेक्षा पैशा मोठा नाही आणि पैशामुळेच जीवन सुखी होईल याची शाश्वती नाही.

मानवी जीवनात सुख-दु:ख हि असतातच. पण मानवाला सुख ह्वेह्वेशे वाटते.व दु:ख नको नकोसे वाटते. पण या अवस्थेत त्याला सहानुभूती मिळाली तर दु;खभार हलका होतो, त्यावेळी त्याला अत्यंत सहानुभूतीची गरज असते. हि सहानुभूती ज्याला जमेल तोच खरा मनुष्य. प्रेमानेच काट्याची फुले होतात ईतरावर आपण मनोभावे प्रेम केले पाहिजे, दुखी मनुष्याला जास्त दुखी करणे हे अत्यंत पापकारक मानले आहे. तो श्रद्धाळु असल्या मुळे दुखी आत्म्याची अनुभूती त्याला येते. निस्वार्थ भक्ती मनात ओथंबून आली असता मन भाविकतेच्या तेजाने ओथंबून येते. वेदांत हा नुसता कळून उपयोगी नाही. त्या प्रमाणे आचरण असले पाहिजे तरच सार्थक जीवनप्रवाह ओलांडून न्यावयास शरीराचा नौकेप्रमाणे उपयोग करावा. मनुष्य मुळातच अपूर्ण असून त्याची सर्व धडपड पुर्णत्वाकडे जाण्याची असते जीवनाचे प्रयोजन गवसल्यावरच कृतकृत्यता लाभते. मनुष्य सदाचारी, नीतिमान, सत्प्रवृत्त असणे आवश्यक आहे.

आपला व्यवहार निर्मळ, प्रामाणिक झाला पाहिजे. बुद्धी स्थिर असलेली व्यक्ती अत्यंत धीरोदात्त असते. जीवनात सत्यनिष्ठेने जगतो त्याला जीवन व्यर्थ गेले, निरर्थक गेले असे म्हणून पश्च्याताप करण्याची पाळी कदापि येत नाही. प्रेम हा स्वर्गाचा मार्ग होय. तेच परमेश्वराचे दुसरे रूप होय. परमेश्वराकडे पाठ फिरवून प्रपंच्यात गुरफटलेल्या माणसाला कोठून मिळणार मनशांती.?

समर्थ रामदास स्वामी म्हणतात — विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुख ।

मानवी जीवन मुळातच क्षणभंगुर अत्यंत अल्प काळ टिकणारे त्यामुळे जीवनाची किंमत ओळखून त्याने जीवनाचे सोने करण्याचा प्रयत्न करावा. जीवनाचे अगाध रहस्य उलगडले तर मन:शांतीची सुरम्य पालवी फुटण्यास कितीसा कालावधी लागणार ?

आपला कमकुवतपना कोणता आहे हे ध्यानात घेऊन तो नाहीसा केला पाहिजे, आपल्या दुबलळेपनाचे व दुर्गुणाचे सुद्धा सद्गुण समजून समजून आपण देव्हारे माजवितो हि बाब अत्यंत शोचनीय आहे. शुद्ध अंत:करण व मानसिक समतोल हि मानवी जीवनातील फार मोठी उपलब्धी आहे. खऱ्या ज्ञांनाचे महत्व ज्ञांनात नसून जीवन हेच खऱ्या ज्ञानाचे रहस्य आहे सत्य ज्यावेळी अनुभवले जाते त्या आदर्शांनुसार जीवन जगले तरच त्याची मातब्बरी! निर्मळ चित्तामुळे स्वानुभूति होते. द्वेषादीविकार तर अजीवात वार्याला उभे राहात नाही. योग्याभ्यासामुळे जीवात्म्याची खरी ओळख पटते. योग म्हणजेच जुळणी. आत्म्याचा परमात्म्याशी संयोग योगामुळे साधते. आत्मा मुळचा परमात्म्याचाच अंश आहे परंतु परमात्म्या विषयी त्याला दुरावा वाटतो. त्याची लख विसरून तो भलभलत्या निरर्थक गोष्टीत स्वत:ला गुंतवून घेतो. आपला स्वभाव व प्राप्त परिस्थिती याचा यथायोग्य मेळ घातला पाहिजे. आत्मज्ञांन, आत्मानुभूती हीच आपल्या जीवनाची द्वारका आहे तिच्यावरच आपल्या जीवनाची द्वारका आपल्याला उभाराव्याची आहे. आपण ईतरां विषयी नेहमीच प्रेम, मांगल्य, सद्भावना बाळगली पाहिजे, कोणताही स्वार्थ न ठेवता सर्वाशी सलोख्याने, प्रेमाने राहावे. आत्मशोधनाच्या मार्गाने जितकी आपण वाटचाल करू तितकेच तेज आपल्या जीवनात वाढेल.सर्व जगाला ब्रम्ह हेच अधिष्ठान, वैराग्य, आणि विवेक यांचा मेळ हवा.

संतांना साधनेद्वारे आत्म विद्दुत प्राप्त होते. त्यांच्या शरीराचा कण नि कण शक्तीसंपन्न असतो. प्रेमाहून कोणतीही साधना श्रेष्ठ नाही. प्रेम म्हणजेच ईश्वरप्रेम-सद्गुण सत्य यांना पर्याय नसते. सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी विद्यमान असलेल्या आत्मतत्वाची जाणीव आपण ठेवलीच पाहिजे मनुष्याच्या जीवनक्रमात अनेक बरे वाईट स्थित्यंतरे येतात. बाह्यत: ती दुखद, अरीष्ट्कारक वाटत असली तरी ती देवदूता सारखी असतात. मनुष्याला खऱ्या उन्नतीचा मार्ग तीच दाखवितात पण ते आपण समजून घेत नाही. माया हे ब्रम्हाचे प्रगट रूप. मायेत राहून ब्रम्हांला विस्र्रणे म्हणजे अज्ञान होय. ब्रम्हाची ओळख ठेवून जगणे म्हणजेच ज्ञानी होय. माणसातील अहंकाराचा अतिरेक म्हणजे हेच खरे दुखा:चे मूळ. जर आपण शांतपणे विचार करून गेलो तर ज्याचा गर्व करावा असे काहीतरी आपल्या जवळ आहे काय? मग फुकाफुकी गर्व कशाचा करावा ? याचा विचार केलाच पाहिजे ! मनुष्य धर्म, पंथ, संप्रदायाच्या नावावर द्वेष पसरवितो, फसवणूक करतो. ईतरांना दुखी-कष्टी बनवितो,यातना देतो. परंतु प्रेमाची वात हीच खरी सुखदायक असते. प्रेम शक्ती सर्व श्रेष्ठ असून वाईटातला वाईट माणूस देखील त्यामुळे आपला दुष्टपणा सडून वश होतो चित्त शुद्ध झाले असता मनाला अपरिमित आनंद होतो. भाविक मन यालाच म्हणतात.

चिंतन बिंदू

* स्वत:ला सर्वात बुद्धिमान समजन ही मानवाची सर्वात मोठी चूक होय. एखादे वेळी चूक झाली तर परत ती चूक न करण्याचा पश्चाताप करून संकल्प केला तर देव सुद्धा माफ करतो.अशा सहृदय,सत्कर्मशील,दयाळू वृत्तीच्या मानवा वर प्रभूची विशेष कृपा असते.
* घरात श्रीमंती येण हि काही आश्चर्य कारक बाब नाही. पण ती कोणत्या मार्गाने येत आहे. हे महत्वाचे आणि आल्या नंतर ती सत्कार्य किंवा परोपकारात लागत आहें की नाही. ह्या वर विशेष लक्ष असायला हवे. अन्यथा ती समुद्राच्या खाऱ्या पाण्या प्रमाणे अयोग्य समजावी.
* तन आणि धन यांची सुंदरता क्षणिक आहे, कारण क्षण बदलत असतो. पण ‘मन’ याची सुंदरता तन, धन संपल्या नंतरही टिकून राहते, व मानव अमर होतो.
* सर्व जीवांत परमात्मा अंश समान रुपात आहें, म्हणून वरील आवरण बघून कोणाची घृणा करू नये. हि मूर्खता होय.
* जो पृथ्वी वर आला तो जाणार हे सर्वांला माहित आहे, पण अजून बरेच आयुष्य आहे या भ्रमात राहून वेळ घालवू नका. सत्कर्म करणे सुरु करा नाहीतर अचानक कुकर्म घेऊनच जावे लागेल.
* जेव्हा सामर्थ आहे तेव्हा वेळ नाही. वेळ आहें तर शक्ती नाही. जेव्हा सर्व काही आहें पण काहीच करण्याची ईच्छा नाही यामुळे सत्कार्यातून वंचित राहू शकतो ! म्हणून जेव्हा प्रेरणा मिळेल,तुरंत सत्कार्याला लागा,- प्रभू कृपेने कार्य सिद्ध होईल.
* आपण ज्या भौतिक वस्तुत सुख शोधत आहे, त्यात तो कधीच नव्हता, आताही नाही,पुढेही मिळणार नाही. खरी सुख-शांती अंर्त मनातच आहे, खरी शांती दुसऱ्याला सुख देण्यातही मिळेल, शोधून बघा !

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu