Outer Face of Human and its a your Identity. Human have two faces one which visible is outer face and one is hidden is Inner or hidden face, our identity is a part of our outer face. Outer Face of Human and its a your Identity. this article is written by Pradeep Narhari kelkar.
लिहू वाचू आनंदे…
लोक बहुदा समोरच्याला बाह्य रूपाने ओळखतात, अंतरंग जाणून घ्यायला कुणाला वेळच नसतो. असं माझी बहिण स्मित पाठारे हिला वाटतं. आपण आपल्या जवळच्या रोज भेटणा-या, दिसणा-या व्यक्तींना त्यांच्या बाह्य रूपावरून ओळखत असतो. बाह्य रूपावरून ती व्यक्ती कशी असावी किंवा आहे. याबाबतीत आपल मत तयार करीत असतो. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीचे बाह्य रूप चांगले आहे म्हणजे ती व्यक्ती चांगली आहे, सुसंस्कृत आहे असं मत बनविणे योग्य होणार नाही. कदाचित बाह्य रूप हे फसवे असू शकते. त्या व्यक्तीच्या अंतरंगात – मनात वाईट विचार असू शकतात. अशी व्यक्ती गोड बोलून स्वतःचा फायदा करून घेणारीही असू शकते. एखाद्या व्यक्तीचे बाह्य रूप चांगले नाही, बोलण्या, वागण्यात तारतम्य नाही. अशा व्यक्तीच्या अंतरंगात – मनात निर्मल, शुद्ध विचार असतील. पण बाह्य रूप चांगले नाही म्हणून जर आपण अशा व्यक्तीला आपल्यापासून दूर केले तर त्याच्या मनातील सुंदर सुसंस्कृत विचारांना आपल्याला पारखे व्हावयास लागेल. पर्यायाने आपण चांगली संगत सोडून भलत्याच मार्गाने जाऊ आणि आपल्यावर संकट ओढवून घेऊ.. परिणामी आपल्याला त्रास होईल. आपली फसगत होऊ नये यासाठी आपण बाह्य रूपावर न भाळता, व्यक्तीच्या अंतरंगात डोकाविले पाहिजे, त्याचा मनाचा गाभा, मनातील विचार आचार ओळखले पाहिजेत. सुंदर, निर्मल अंतरंग जाणून घ्यावयास पाहिजे. व्यक्तीच्या बाह्य रूपावर न जाता जात अंतरंगातील विचारांचा ठाव घेतलात तर फसगत होणार नाही. म्हणूनच अंतरंग जाणून घ्यावयास वेळ नाही असं म्हणून कधीही चालणार नाही. पहा विचार करून.
प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, २३०९२०१३.