आता कॅन्सरही बरा होऊ शकतो




Now you can cure your Cancer, Its a curable disease, if you get treatment properly then its now big disease for you, read this article for proper solutions on Cancer.
treatment on cancerआपण लहानपणापासून एकच गोष्ट विज्ञानाच्या पुस्तकात शिकत आलो आहोत. ती म्हणजे आपल्या शरीरात एक रोग प्रतिरोधक पेशी असते. ही पेशी आपल्याला रोगांपासून दूर ठेवते, होणाऱ्या रोगांपासून आपले संरक्षण करण्याचे काम करते. पण आताच वैज्ञानिकांनी एक नवीन शोध लावला आहे. त्यांनी कॅन्सरला नष्ट करणाऱ्या प्रतिरोधक पेशीचा शोध लागला आहे.

ही पेशी कॅन्सरच्या जिवाणूंशी लढत असते. त्यामुळं या प्रतिरोधक पेशीला ‘माइलोईड डिराईव्ह सप्रेसर सेल्स’ असं नाव देण्यात आलंय. याचाच अर्थ ही पेशी कॅन्सरच्या जिवाणूंना पूर्णपणे नष्ट करते.

विज्ञानाच्या इम्यूनिटी जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका तपशीलानुसार, कॅन्सरच्या स्टेम पेशी या रासायनिक संयुगं वापरून केलेली रोगाची विशिष्ट प्रकारची प्रतिरोधक शक्ती मानली जाते. वैज्ञानिकांच्या मते, कॅन्सरला नष्ट करायचं असेल तर प्रथम कॅन्सरचे स्टेम पेशींना नष्ट करणं फार गरजेचं आहे. काही शोधकर्त्यांनी तर कॅन्सरच्या धोकादायक असणाऱ्या पेशींचा शोध लावला आहे. ज्यानं कॅन्सर पुन्हा होऊ शकतो.

कॅन्सरला नष्ट करणाऱ्या पेशींचा शोध लागला तर कॅन्सर ज्या विषाणूंमुळं होतो त्या विषाणूंशी लढण्यासाठी या पेशींचा जास्त उपयोग होईल आणि कॅन्सरचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड