नवी दिल्ली- आम आदमी पार्टी
अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला अनेक स्थरांतून जोरदार पाठिंबा मिळत असून पक्षासाठी पार्टी फंड देणा-या लोकांची संख्याही वाढताना दिसत आहे. आम आदमी पार्टीला दिल्लीत दररोज सहा ते सात लाखांचा फंड मिळत असल्याची माहिती पार्टीकडून नुकतीच देण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीला फंड देणा-यांमध्ये भारतातुनाच नव्हे तर परदेशातूनही फंड देत आहे. तसेच या यादीमध्ये बिझनेसमन, रिक्षा ड्रायव्हर, विद्यार्थी, महिला, सैनिक यांचा समावेश आहे. हाँगकाँग येथे राहणा-या अमित अग्रवाल या मूळच्या एका भारतीयाने या पार्टीला ५० लाखांचा फंड दिला आहे. तर नववीत शिकणा-या नीधि नावाच्या विद्यार्थीर्नीनी आपला दोन वर्षाचा सांभाळून ठेवलेला पॉकेट मनी दिला आहे. के.सी मोहिंद्रू या ८७ वर्षाच्या वृध्दाने त्यांना मिळणारे पेन्शन पक्षाला फंड म्हणून दिले आहे. आम आदमी पार्टीला फंड देणा-या लोकांची संख्या ही ४५ हजारावर जावून पोहोचली आहे. पक्षाला पुढे नेण्यासाठी आपला वेळ आणि पैसा खूप पक्षासाठी देण्यात यावा असे आवाहन आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम आदमी पार्टीच्या फंडात आतापर्यंत साडे अकरा कोटी रूपये जमा झाले असून हा आकडा वाढताना दिसत आहे. अनेक जण तर ५०० रूपयांपेक्षा अधिकच फंड देत आहेत. एकटया दिल्लीत एका कॅम्पेनमध्ये पार्टीला ४ लाखाचा फंड मिळाल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली. जवळवास २०० रिक्षाचालकांनी ५०० रूपयाप्रमाणे ५० हजार रूपये फंड जमा करून तो पक्षाला दिल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले.