“तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा”
नेताजी सुभाषचंद्र बोस
जन्म : २३ जानेवारी १८९७ कटक (उडीसा)
मूत्यू : १८ ऑगस्ट १९४५ (रोजी सायगाव विमानतळावर अखेरचे दिसले)
नाव : सुभाषचंद्र जानकीनाथ बोसबंगालचा बावनकशी हिरा म्हणून ज्यांचा उल्लेख करावा असे सुभाषबाबू भारताच्या स्वतंत्र लढ्यात कायमच अग्रणी राहिले. इंग्लंडला जाऊन आय.सी.एस. होऊन सुद्धा ” परकीय सत्तेच्या गुलामगिरीत नोकरी करणार नाही, व परकीय सत्तेचा बिमोड केल्याशिवाय राहणार नाही”. या तत्वासाठी त्यांनी देशबंधू चित्तरंजनदास यांच्या छत्राखाली स्वतंत्र लढ्यात भाग घेतला. कलकत्ता महानगर पालिकेत निवडून आले, व अधिकारी बनले. त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. पुढे राष्ट्रीय सभेच्या निमित्ताने पं. नेहरूच्या सोबत ” भारताचे संपूर्ण स्वतंत्र ” हे ध्येय ठेऊन काम करावे असे ठरविले. त्यातून ते दोन वेळा राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर मतभेदामुळे त्यांनी पुरोगामी दलाची स्तापना केली. सरकारला ऐनवेळी तुरी देऊन निसटण्यात कुणीही त्यांचा हात धरू शकत नवते. ” आझाद हिंद सेना ” त्यांनी जगाच्या कोपर्यापर्यंत गाजविली. ब्रिटिशांचे समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी अखंड परिश्रम घेतले. पुढे ते प्रत्येक लढ्याला तयार झाले व त्यात ते यशस्वी झाले. सुभाष बाबूंची “जयहिंद” हि सिंहगर्जना आजही देशाच्या कानाकोपर्यात गाजत आहे.
Subhas Chandra Bose also known as Netaji, was an Indian nationalist whose unsuccessful attempt in the waning years of World War II to liberate India militarily from British rule roused patriotic feelings in India.