मराठी चित्रपटाचे प्रसिध्द दिग्दर्शक राजीव पाटील यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने मुंबईत सोमवारी दुपारी आकस्मिक निधन झाले. ते ४२ वर्षाचे होते. सोमवारी त्यांना ह्दयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे काही वेळातच निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांनी मराठी चित्रपट श्रुष्टीला एक नवा चेहेरा दिला. राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांचा दोन वेळा सम्मान करण्यात आला. उत्तम कलाकृतीसाठी झटणारा एक दिग्दर्शक आज आपल्यापासून दुरावला आहे.
राजीव पाटील यांनी मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन करताना नवनवे प्रयोग करून मराठी प्रेक्षक खेचले. ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘सावरखेड एक गाव’, ‘ सनई चौघडे’, ‘पंगीराला’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. राजीव पाटील यांनी दिग्दर्शित केलेला वंशवेल हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. तो येत्या महिन्याचा १८ तारखेला प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या ‘ जोगवा’ आणि ‘पंगीराला’ या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. धेय्यवेड्या राजीव पाटलांच्या जाण्याने मराठी चित्रपट श्रुष्टीवर शोककळा पसरली आहे.