खरचं कुणी कुणाचं नसतं…

Like Like Love Haha Wow Sad Angry Kharach kuni kunach nasat, Pradeep Narhari Kelkar written Marathi articles for you. read...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Kharach kuni kunach nasat, Pradeep Narhari Kelkar written Marathi articles for you. read Marathi articles. we came alone and have to go alone.
kharach kuni kunach nasat

” खरचं कुणी कुणाचं नसतं. ” असं म्हटलं जातं. या विश्वाच्या रंगमंचावर कुणीचं कुणाचं नाही. फक्त या विश्वात जन्म घेऊन आपण आपल्याला ईश्वरानी दिलेली भूमिका अगदी प्रामाणिकपणे साकारत असतो. आपले आई वडील, भाऊ बहिणी, नातेवाईक आणि मित्र मैत्रिणी, खर पाहता आपले कुणीच नाहीत. आयुष्याचा दिनक्रम सुरळीत सुरु रहावा यासाठी ईश्वरानी ही सर्व नाती निर्माण करून आपल्याला प्रेमाच्या धाग्यात गुंफून ठेवले आहे असे मला नेहमी वाटतं आलं आहे. कारण जन्म घेतांना आपण आपल्या बरोबर काहीच आणीत नाही नी भूमिका पूर्ण झाल्यावर जातांनाही काही बरोबर घेऊन जात नाही. या विश्वात जे जे आहे त्या सर्व गोष्टींचा लाभ आपण आपली भूमिका साकारत असतांना घेत असतो. पण या विश्वात येतांना किंवा जातांना आणता – नेता येत नाही. मग इथे आपल्याला लाभणारी नाती, वैभव, संपत्ती आपली आहे का. आपली असती तर आपल्याला आणता – नेता आली असती. अगदी मनापासून विचार करा की आपलं काहीचं नाहीये. असे असतांना ही नाती किंवा हा माझा, ही माझी, असं आपण का म्हणावं. का एकमेकात गुतून रहायचं. आपला जन्मांतरीचा सोबती ईश्वर आहे त्या ईश्वराचा नामस्मरणात रहावं, म्हणजे नक्कीच आपल्याला म्हणता येईल की ” खरचं माझा ईश्वर आहे ” कुणी कुणाचं नाही हे तुम्ही कसं म्हणता. मला नाही पटतं, कारण ईश्वर माझा सोबती आहेचं आहे. हरी ओम.

प्रदीप नरहरि केळकर…
ठाणे, ०६०९२०१३.

Source: प्रदीप नरहरि केळकर (Pradeep Narhari Kelkar)

We came alone and have to go alone so “Kharach kuni kunach nasat ” . Read this article based on your life.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories